Coronavirus कोरोना विषाणू म्हणजे काय? | जाणून घ्या याची लक्षणे..!


नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे.  डोळ्यांना दिसूही न शकणाऱ्या एका सुष्म जीवामुळे सगळं जग सध्या हैराण आहे. पहिल्यांदा चीन मध्ये आढळून आलेला हा नवा Corona Virus अमेरिकेमध्ये पण पोहोचलेला आहे. अमेरिकेतही त्याची लागण झालेला रुग्ण समोर आलेला आहे. नेमका हा Corona Virus काय आहे, त्याचा प्रसार कसा होतो आणि त्यापासून तुम्हा-आम्हाला काही धोका आहे का? या सर्वांची प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आज देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. 

१. Corona Virus किंवा कोरोना विषाणू म्हणजे काय?

elemental.medium.com

शाळेत विज्ञानाच्या तासाला तुम्ही विषाणूंविषयी शिकल्याचं तुम्हाला आठवत असेल. थोडक्यात सांगायचे झाले तर विषाणू हे दुसऱ्या जीवांच्या पेशींवरती हल्ला करून जगणारे एक सुष्म जीव आहेत. काही विषाणूंच्या बाह्य भागांवरती खिळ्यांसारखे किंवा काट्यांसारखं आवरण असतं ज्यांना कोरोना असं म्हटलं जातं. आणि हे आवरण असलेल्या विषाणूंना Corona Virus म्हटलं जातं. 

२. कोरोना विषाणूची लागण झाल्याने काय त्रास होतो.?

thesun.co.uk

ताप,खोकला आणि श्वास घेताना त्रास कोरोना व्हायरस ची लक्षणं आहेत. पण उपचार झाले नाहीत तर त्याचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात. जसे अवयव निकामी होणे, न्यूमोनिया आणि मृत्यू,  नेहमीच्या सर्दी आणि खोकल्यासारखा हा विषाणू संसर्गजन्य आहे म्हणजेच माणसापासून माणसांना खोकला किंवा शिंकेमार्फत त्याची लागत होऊ शकते. 

३. कोरोना विषाणूचा प्रसार कशामुळं झाला असावा.?

telegraph.co.uk

कोरोना व्हायरस च्या सध्याच्या उद्रेकाची सुरुवात चीनच्या वुहान शहरापासून झाल्याचं आतापर्यंतच्या अभ्यासात दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच काहीजण या विषाणूला ” वुहान कोरोना व्हायरस ” म्हणूनही संबोधतात आहे. या उद्रेकामागचं कारण काय असावं आणि त्यापासून काय धोका निर्माण होऊ शकतो याविषयी शास्त्रज्ञ अजूनही अभ्यास करत आहेत. त्यांच्या अंदाजानुसार हा विषाणू प्राण्यांमार्फ़त माणसांपर्यंत पोहोचला असावा. झालं असं कि वुहान शहरात शेकडो लोक तापाने आजारी पडले. यातील बहुतेक जण वुहान च्या एका स्थानिक बाजारपेठेच्या संपर्कात होते. चीनमधल्या अशा बाजारपेठेत मांसाची आणि प्राण्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होत असते. अनेकदा वेगवेगळ्या जातींचे प्राणी दाटीवाटीने एकत्र ठेवलेले असतात. त्यातूनच विषाणूंचा प्रसार होऊन नवीन विषाणू जन्माला येत असल्याचं याआधीच्या विषाणूंच्या अभ्यासामध्ये समोर आलेलं होतं. वुहानच्या बाजारपेठेतही तसंच काहीतरी घडलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. 

४. कोरोना विषाणूंची लागण याआधी कधी झाली होती.?

infectioncontrol.tips

कोरोना व्हायरस च्या अनेक प्रजाती आहेत पण आजवर ७ वेळा त्याचा प्रादुर्भाव माणसांना झाल्याचं समोर आलेलं आहे. याआधी अशाच प्रकारच्या कोरोना व्हायरस ने पूर्व आशिया मध्ये सिव्हिअर रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे SARS आणि २०१२ च्या सुमारास पश्चिम आशियात मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे MERS या रोगांची लागण झाली होती जी इतर खंडांमध्येही पसरली. त्यानंतर आता वुहान कोरोना व्हायरस चा उद्रेक झालाय. 

५. कोरोना विषाणू पासून संरक्षण कसे करायचे.?

foxnews.com

ज्यांना कोरोना व्हायरस ची लागण झालेली आहे त्यांपासून दूर राहणं, इतरांपासून त्यांना दूर ठेवणं इतकंच सध्या आपण करू शकतो. विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून अनेक विमानतळांवरती प्रवाशांची तपासणी होतेय. भारतातही हवाई वाहतूक मंत्रालयानं चीनमधून येणाऱ्या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सुरु केलेय तसेच चीनमधून जाणाऱ्या प्रवाशांना सावधानतेचा इशारा दिलाय. एरवी मेडिकल सायन्स ला माहित असलेल्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाला कि त्यावरती कोणतं औषध द्यायचं किंवा त्याला कुठली प्रतिबंधात्मक लस आहे याविषयीचं संशोधन झालेलं असत ती माहिती डॉक्टर्स पर्यंतही पोहोचलेली असते. पण हा जो नवा कोरोना व्हायरस आहे त्याच्याविषयी आपल्याला फारशी माहितीही नाहीये त्याचबरोबर त्याला रोखायचं कसं हे सुद्धा आपल्याला अजून आपल्याला ठाऊक झालेलं नाहीये आणि म्हणूनच त्याचा प्रसार रोखणं तज्ज्ञांना गरजेचं वाटतं. 

तर मित्रांनो तुम्हाला या Corona Virus बद्दल माहिती आवडली असेल तर तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या विषाणूंबद्दल माहिती पोहोचेल आणि त्याबद्दल काळजी घेतील. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *