आपण २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो ? | यामागचं कारण काहीच लोकांना माहित असेल.

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो २६ January हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. पण आपल्याला असे आढळून येते बऱ्याच जणांना १५ August आणि २६ January यामधील फरक अजूनही माहिती नाही. हजारो स्वतंत्रसेनानी , देशभक्त, क्रांतिवीर या आपल्या भारत देशासाठी शहीद झाले यांचे एकच स्वप्न होते कि भारतातली येणारी पुढची पिढी स्वतंत्र देशात जन्माला यावी. म्हणून आज आम्ही तुम्हाला आपण २६ January का साजरा करतो या बद्दल सांगणार आहोत.

मित्रांनो तुम्हा सर्वांना माहिती आहे कि आपल्या देशावर कित्येक वर्ष ब्रिटिशांनी राज्य केले आणि आपला देश स्वतंत्र व्हावा म्हणून हजारो जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यावेळेस ब्रिटिशांनी त्याचे कायदे आपल्या देशावरती लादले. आणि त्यांच्या कायद्यांचा जो कोणी विरोध करत त्यांच्यावर ते अत्याचार करत. १३ एप्रिल १९१९ साली जालियनवाला बाग ची हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली तेव्हा भागात सिंग, उद्धम सिंग, सुखदेव,राजा राजगुरू, असे अनेक क्रांतिकारी निर्माण झाले. कारण हि घटना एवढी वाईट होती कि जनरल डायर याच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांनी लहान मुले,वृद्ध,स्त्रिया अशा हजारो लोकांना मारून टाकले होते. या घटनेनंतर सगळ्या भारतीयांमध्ये स्वातंत्र्याची आग धगधगू लागली होती. प्रत्येकजन भारताच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान द्यायला तयार होता. नंतर २६ January १९३० मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेंसने ब्रिटिशांकडे पूर्ण स्वराज्याची मागणी केली. आणि त्यावेळेस त्यांनी लाहोर मध्ये रवी नदीच्या किनारी तिरंगा फडकावला. हा दिवस संपूर्ण भारतात स्वतंत्रदिनासारखा साजरा करण्यात आला.

india-asianstudies.weebly.com

यानंतर ब्रिटिशांची मनमानी आणि दुसरे महायुद्द्ध यामुळे भारताला स्वातंत्र्यासाठी जास्त काळ लढा द्यावा लागला. आणि अखेर १५ August १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वातंत्र्य जरी झाला तरी भारताकडे स्वतःचे संविधान नव्हते. मित्रांनो एक छोटी संस्था जरी चालवायची झाली तरी त्या संस्थेसाठी नियम बनवावे लागतात. मग तर आपला भारत देश एवढा मोठा त्याच्यामध्ये वेगवेगळे राज्य आहेत ते चालवण्यासाठी आपल्याला काही नियम बनवावे लागणार होते. म्हणून हे संविधान इंग्लिश मध्ये आपण त्याला Constitution म्हणतो. हे बनवण्यासाठी २८ August १९४७ रोजी Dr. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेत समितीची स्थापना करण्यात आली. तसेच ४ नोव्हेंबर १९४७ साली समितीने विधानसभेला आपला पहिला मसुदा सादर केला. विधानसभेत २ वर्ष ११ महिने आणि १८ दिवसात अनेक सत्रांमध्ये या संविधानावर चर्चा आणि सुधार होत राहिला. हे सत्र जनतेसाठी खुले होते.

स्वातंत्र्याच्या मागणीसोबतच स्वाधीनतेची मागणी देखील ब्रिटिशांकडून मान्य करण्यात आली. आणि २६ नोव्हेंबर १९४९ साली भारताचे संविधान तयार झाले. पण ते अमलात कधी आणायचे यावर नेत्यांची चर्चा झाली आणि त्यांच्या मनात २६ जानेवारी हि तारीख आली. कारण पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवरी १९३० रोजी लाहोर मध्ये रवी नदीच्या किनारी तिरंगा फडकावला होता आणि पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. २४ जानेवारी १९५० रोजी विधानसभेच्या ३०८ सदस्यांनी मसुदा मान्य केला आणि संविधानाच्या २ हस्थलिखित प्रति काढल्या. त्यापैकी एक हिंदीमध्ये होती आणि दुसरी इंग्रजीमध्ये.

२ दिवसांनी २६ जानेवरी १९५० रोजी संविधानाची अंमलबजावणी झाली आणि भारत गणराज्य बनले. मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल कि २६ जानेवारीला आपण संविधान अमलात आणले गेले म्हणून आपण हा दिवस प्रजासत्ताक दिवस म्हणून साजरा करतो.

मित्रांनो हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. कारण प्रत्येकाला आपण २६ जानेवारी का साजरा करतो हे समजले पाहिजे. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *