नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून धक्काच बसेल.!

नवऱ्याचे बाहेर अफेअर म्हणून बायको सुद्धा बाहेर अफेअर करते पण पुढे जे घडते ते पाहून धक्काच बसेल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो राजन आणि अमृता हे दांपत्य अगदी सुखी संसार करत होते. लग्नाला तीन वर्षे पुर्ण झाली होती. एक गोंडस बाळं दोघांच्या पदरात होते. तसेच राजन एक मल्टी-नेशनल कंपनीत उच्च पदावर कार्यरत होता त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिति सुद्धा खूप चांगली होती. परंतू राजन हा चंचल मनाचा मनुष्य होता. अमृता खूप गुणी होती ती आपल्या सासू ची आपल्या आई प्रमाणे काळजी घ्यायची घरात सुद्धा नोकर चाकर असून स्वयंपाकघरात स्वत: जातीने लक्ष घालायची.

बाळाची व राजनची ती खूप प्रमाणे व मनापासून देख रेख करायची. राजन सुद्धा चांगला होता मात्र त्याचे मन फारच चंचल होते त्याला नवीन नवीन बायकांसोबत अफेयर करयला आवडायचे त्याला नवीन नवीन बायका आवडायच्या. चला तर या लेखात आपण पाहूया पुढे अमृता आणि राजन या दोघांच्या आयुष्यात नक्की काय घडले ते जाणून घेवूया.

राजन हा अत्यंत चंचल मनाचा होता त्याचा स्वाभाव बायकांच्या बाबतीत खूप चांगला नव्हता अमृता सारखी लाखात एक बायको असून सुद्धा राजन बाहेर कधी ऑफिस मधल्या तर कधी सोशल मीडिया वरच्या मैत्रिणीं सोबत प्रेम संबंध म्हणजेच अफेयर करायचा. मोठ्या पोस्टवर असल्या कारणाने राजनला भारतभर फिरावे लागत असे तो जिथे जायचा तिथे कोणी ना कोणी महिलेशी कसले ना कसले संबंध जोडून तो येत असे.

एक दिवशी अमृताने राजन ला एकदा नव्हे तर अनेकदा रंगे हातो पकडला होता मात्र राजन काही सुधराण्याचे नाव घेत नव्हता. शिवाय राजनची आई सुद्धा राजनच्या चुकांवर पांघरुन घालत असे व काही ना काही अमृतला समजवून वातावरण थंड करत असे. अमृतला राजनच्या वागण्याचा खूप त्रास होत होता तिने राजनला खूप समजवण्याचा प्रयत्न केला.

बिचारी खूप रडत होती मनातल्या मनात सगळे दु:ख दाबून चेहर्यावर हसू ठेवून समाजात वावरत होती. घरच्या बाहेर पडून स्वतःच्या पायावर काही करणे ही तिला जमणार नव्हते कारण तिच्या अंगावर सासू च छोट्या बाळाची जिम्मेदारी होती.

जे होत आहे ते फक्त ती बघू शकत होती. परंतू एके दिवशी राजनने अतिच केले तो आपल्या मैत्रिणीला घेऊन घरी आला होता अमृताला हे कदाफि सहन झाले नाही तिने सरळ बाळाला उचलले व माहेरी निघून गेली. माहेरी गेल्यानंतर तिच्या आईने तिला समजावले की जर तू अशी वागलिस तर राजन तुटून जाईल सासूच्या तब्येतीची काळजी कोण घेईल बाळ देखील मोठे होत आहे त्याला सुद्धा त्याच्या बाबांची सावली लागणारच. हे सगळे ऐकून अमृता सासरी परत आली.

अमृता सासरी जाऊन सारखी कोणाशी तरी कॉल वर बोलत असायची. राजनने ही गोष्ट पाहिली त्याने तिच्या फोन मध्ये मानस नावाच्या व्यक्तिचा फोन नंबर व नाव पाहिले. राजनच्या पाया खालची जमीनच सरकली त्याला खूप टेंशन आले मानसिक त्रास होवू लागला. परंतू तो काही बोलू शकत नव्हता त्याच्या काहीच हातात नव्हते तो फक्त जे चालू आहे ते उघड्या डोळ्यांनी पाहत होता.

असे हे अनेक दिवस चालले होते. एक दिवस हिम्मत करुन राजन अमृता जवळ आला व दबक्या आवजात तिला सगळे विचारु लागला. तेव्हा ती त्याला म्हणाली की तू करतोस ते बरोबर मी करते ते चूक हा न्याय नाही आहे आणि मी जे कॉल वर बोलते जो मानस आहे तो पुरुष नसून माझी आई आहे. हे ऐकून राजनच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली व या पुढे दोघे ही सुखी संसार करु लागले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *