लग्नाला ३ वर्ष होऊन गेले तरी मूल होत नव्हते; शेवटी या महिलेने वैतागून उचलले हे पाऊल, आज तिच्यासोबत….
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या युगात परिवारा मध्ये अनेक कारणांमुळे भां’डण वा’द होतात. अश्याच एका वादाबद्दल आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे सांगणार आहोत. या लेखाचा शेवट खूप आश्चर्यकारक आहे तो नक्की वाचा. सकाळी-सकाळी पूजा स्वयंपाकघरात आल्यावर मालती बाईंनी विचारले ‘ काय झाल केलीस का टेस्ट ? त्यावर ती म्हणाली हो आई नि’गेटीव्ह आहे टेस्ट.
यावर सासूबाई म्हणाल्या हा ते काय दरवेळी ठरलेलेच आहे, उगीच आशा लावतेस. त्यापेक्षा निघून का जात नाहीस इथून म्हणजे आमची पीडा जाईल. प्रसादवर एवढी काय जादू केलीस काय माहीत ? किती चांगल्या घरातल्या सुंदर मुली चालून येत होत्या. ‘ हे सगळं बोलणं ऐकून पुजाला खुप त्रास होत असे. पण हे तिला काही नवीन नव्हतं, गेली दोन वर्षेती हेच ऐकत होती. खुप दवाखाने केले, वेगवेगळ्या डॉक्टरांना दाखवलं, शेवटी बाबा, बुवांकडे ही उपाय केले पण काहीच फरक पडत नव्हता. मालतीबाई येता जाता टोमणे मारत असे त्यामुळे ती या सगळ्याला वैतागली होती.
पुजा आणि प्रसादाचे ल’व्ह मॅ’रेज होते पण अगदी मुहू’र्त बघून थाटामाटात लग्न झालं होतं. कॉलेज पासून एकत्र होते शिवाय नोकरी ही एकाच ठिकाणी करत होते. त्यामुळे दोघांनी घरी सांगून परवानगी घेऊनच लग्न केलं होतं. तस बघितलं तर पुजा मालती बाईंना सुरुवातीपासूनच आवडत नव्हती. पण बाकीच्या नातेवाईकांनी समजावलं आणि प्रसादच्या हट्टापुढे त्यांचं काही चाललं नाही.
त्यामुळे सुरुवातीपासूनच मालतीबाई पुजाला पटवून घेत नव्हत्या, सतत राग करायच्या आणि चूका काढायच्या हे येत नाही ते येत नाही. पण ती दुर्लक्ष करत होती. माधवराव तिला खुप सपोर्ट करत असत आणि प्रसाद ही तिला खूप आधार देत असे. पण तो ही आता आईच्या बोलण्याला वैतागला होता. त्याच्यासाठी पुजा नोकरी सोडून पूर्ण वेळ घराला देत होती. आईसाठी खूप काही करत होती तरीही आई पटवून घेत नव्हती.
पण तो आईला काही बोलू शकत नव्हता. अलीकडे तर आईचा चिडचिडपणा खूप वाढला होता. ल ग्ना ला तीन व र्षे झाली तरी अजून मुल नव्हते, सगळे दवाखाने करून झाले होते पण काही उपयोग होत नव्हता. घराण्याचा वंश कसा वाढणार यामुळे आज मालती बाईंनी ठरवलेच होते की काहीतरी मार्ग काढायचाच.
संध्याकाळी सगळे जेवायला बसले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘ प्रसाद माझं आता वय झालं पण डोळे मिटण्या अगोदर मला माझ्या नातवंडाला खेळवायच एवढीच इच्छा आहे तर माझं यात काय चुकलं ? आपले सगळे दवाखाने देखील करून झाले तरीही काही उपयोग होत नाही. तू लग्न तुझ्या इच्छेने केले आम्ही विरोध केला नाही पण मला आता अस वाटतं की तू पुजाला घ’टस्फोट द्यावा.
निदान मला नातवंडाच सुख तरी मिळेल. ‘ प्रसाद माधवराव सगळे स्तब्ध झाले, पूजा रडत आत निघून गेली. कस तरी जेवण आवरून प्रसाद खोलीत गेला तेव्हा पुजा अगदी शांत बसली होती. प्रसाद आत जाताच पुजा म्हणाली, ‘ मला आईंचा निर्णय योग्य वाटत आहे. त्यांची इच्छा योग्य आहे कोणालाही आपली नातवंड बघावं वाटणं हे साहजिक आहे आणि आपण त्यांचं हे सुख हिरावून घ्यायला नको.
मी तुला घ’टस्फोट द्यायला तयार आहे, आपण सगळ्या फॉ’र्मेलिटी करू. ‘ वेड लागलंय का तुला, काय बोलतेस तुला तरी कळतंय का? आणि आपल्या दोघां मध्येही दो’ष नाही. जर तुझ्यात दो’ष आहे असं समजत असशील तर मग माझ्यात ही दो’ष आहे. आपण यावर काढू काहीतरी मार्ग, मी आईला समजावून सांगतो. आपल्या नशिबात असेल तर नक्की या घरात बाळ येईल, पण तू माझ्यासोबत पाहिजेस ‘ अस म्हणत तो बाहेर गेला.
लगेचच त्याने बालिका आ’श्रमातून फॉर्म आणला, सगळ्या फॉ’र्मलिटी पूर्ण केल्या आणि अवघ्या तीन महिन्यांची सिद्धी प्रसाद आणि पुजाच्या आयुष्यात आली. माधवरावांनी ही हा निर्णय मान्य होता पण मालती बाई नाराज होत्या. पण सिद्दीच्या बालपणात त्या हे सगळं विसरून गेल्या आणि पुजा आता खुप खुष आहे, कारण सिद्धीच्या येण्याने तिचीही इच्छा पूर्ण झाली होती. आपल्या माणसांची साथ असेल तर असे अनेक मोठे प्रश्न सहज सुटू शकतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.