LPG गॅस सिलेंडर चा रंग लाल का असतो..? | खरं कारण ऐकून हैराण व्हाल..!

नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे DarjaMarathi मध्ये स्वागत आहे. मित्रांनो आपल्या सर्वांच्या घरी Gas Cylinder हा जेवण बनवण्यासाठी असतो. परंतु आपण कधी विचार केला आहे कि गॅस सिलेंडर चा रंग लाल का असतो? आपल्यातील खूप जणांना माहिती नसेल, पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर चा रंग लाल असण्याचे कारण. खूप वेळा तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल, तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत.

alleghenyfront.org

पहिल्या काळी जेवण बनवण्यासाठी चूल वापरात यायची ज्याने खूप प्रदूषण देखील व्हायचे. पण जसजसे आपल्या यंत्रणांमध्ये विकास झाला माणसाने अशा गॅस चा शोध लावला जो बिना कोणत्या दूरच्या आणि कमी प्रदूषणामध्ये चालतो. मित्रांनो या गॅस च्या मदतीने जेवण बनवणं अगदी सोप्पे झाले आहे. आता सध्या खूप ठिकाणी जेवण बनवण्यासाठी LPG Gas चा वापर होतो. हा गॅस वापरण्याचे खूप फायदे आहेत जे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवतात. म्हणूनच जास्तीत जास्त लोक जेवण बनवण्यासाठी LPG Gas चा वापर करतात. पण याच गॅस सिलेंडर चा रंग लाल का असतो.? देशात खूप अशा कंपन्या आहेत ज्या LPG गॅस उपलब्ध करून देत आहेत. तुम्हाला पण माहिती असेलच कि भारत सरकार सुद्धा LPG Gas चा उपयोग करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ज्याने लाकडी चुलीने वातावरणात होणारे प्रदूषण कमी केले जाऊ शकेल. सध्या क्वचितच कोणी असेल ज्याने गॅस सिलेंडर बघितला नसेल.

livemint.com

गॅस सिलेंडर ला बघितल्यावर एकाच प्रश्न येतो कि त्याचा रंग लाल का असतो? दुसऱ्या कोणताही रंग यांना का नसतो.? देशामध्ये खूप कंपन्या आहेत आणि सर्व कंपन्यांच्या LPG Cylinder चे रंग लाल च असतात. LPG गॅस सिलेंडर ला लाल रंग देण्याचे २ प्रमुख कारणं आहेत. पाहिलं कारण आहे कि लाल रंग धोक्याचा चा संकेत असतो. जो जेवण बनवायच्या गॅस सिलेंडर मध्ये LPG Gas असतो ती अत्यधिक ज्वलनशील असते. भलेही LPG गॅस जेवण बनवण्यास मदत करते पण हि कोणत्या धोक्यापेक्षा कमी नाही. LPG गॅस खूप लवकर आग पकडते अशामध्ये गॅस ला सावधानी मधेच वापरले पाहिजे जेणेकरून याने होणाऱ्या मोठ्या धोक्यापासून वाचले जाऊ शकेल.

safetyandhealthmagazine.com

आता दुसरं कारण म्हणजेLPG Gas ची ओळख करणे आहे. विभिन्न  गॅस च्या सिलेंडर ला वेगवेगळ्या रंगांनी रंगवले जाते. जसे ऑक्सिजन गॅस सिलेंडर ला सफेद रंगाने, कार्बनडाय ऑक्साइड सिलेंडर ला राखाडी रंगाने, नायट्रोजन गॅस सिलेंडर ला काळ्या रंगाने, हेलियम गॅस सिलेंडर ला तपकिरी रंगाने, आणि नायट्रस ऑक्साइड सिलेंडर ला निळ्या रंगाने रंगवले जाते. अशामध्ये रंगांना बघून समजण्यात येते कि सिलेंडर मध्ये कोणता गॅस भरलेला आहे. LPG गॅसला लाल रंगाच्या सिलेंडर मध्ये भरले जाते जेणेकरून याची ओळख सहजतेणे होईल. तर मित्रांनो आता तुम्ही पण समजला असाल कि गॅस सिलेंडर चा रंग लाल का असतो. तुम्हाला माहिती झाले असेलच कि याची कोणती २ कारणे असतात. आता जरी तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर तुम्ही सहज देऊ शकता.

तर मित्रांनो हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला नक्की विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *