छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 3 गुण तुम्हाला आयुष्यात खूप यशस्वी बनवतील | Chatrapati Shivaji Maharaj

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे कुलदैवत. Chatrapati Shivaji Maharaj फक्त आपल्याला शिवजयंती दिवशीच आठवतात अथवा राजकारण करायचे असेल तेव्हा मते मागण्यासाठी. फक्त शिवाजी महाराजांनी त्यांच्या रयतेची सेवा केली म्हणून ते चांगले नाहीत, त्यांनी स्वराज्याची पूजा केली म्हणून त्यांची पूजा केली जात नाही. छत्रपती हे प्रत्येक क्षेत्रातील उच्च स्थान आहे, छत्रपती यांना मोजायचे ठरवले तर त्यांना एकच शब्द आहे तो म्हणजे ” असंख्य “ ज्याची मोजणी करणे अशक्य आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये काम करत असाल तरी चालेल तुमच्या प्रत्येक कामांमध्ये शिवरायांचे गुण आणि शिक्षण उपयोगाला येते. म्हणून शिवाजी महाराजांकडून हे ३ धडे शिकलात तर जगावर राज्य कराल.

१. गनिमी कावा

गनिमी कावा कसा केला जायचा याची माहिती सर्वांना असणारचं. कधी हा गनिमी कावा खानाचा कोथळा काढताना दिसला तर कधी ३५ हजार मुघल सैनिकांशी फक्त ७ हजार मराठा सैनिक लढताना दिसला. शत्रूवर कशी मात करायची हा गनिमी कावा शिकवतो. उघड्या डोळ्यांनी बघणार्यांना वाटेल हि लढाई छत्रपतींना जिंकणे शक्य नाही, फौज खूप कमी आहे, पण याच कमी फौजेच्या बळावर गनिमी कावा करून लढाया जिंकल्या. अमावसेच्या रात्री शत्रू गाफील असताना हल्ले केले. शत्रूला वाटायचे ३० हजाराची फौज समोरून येत आहे पण एक मावळा हातामध्ये २ मशाली पकडायचा सोबतच जनावरांच्या शिंगालाही त्या मशाली बांधल्या जायच्या ज्यामुळे दुरून येत असताना हजारो सैनिक येत असल्याचा भास होत असे. अगदी याच प्रमाणे आपणही संकटाच्या काळी घाबरून न जाता स्वतःला कमी न लेखता संकटांवर गनिमी कावा कसा करता येईल याचा विचार करायला हवा. कोणताही वाद किंवा भांडण शक्तीचा वापर करण्याआधी युक्तीचा वापर करून सोडवण्याचा प्रयत्न करा १००% याचा तुम्हाला फायदा होईल.

२. Consistency

info.zimmermarketing.com

छत्रपती शिवाजी महाराज एक लढाई जिंकल्यानंतर त्याचे सेलिब्रेशन करत महिना वाया घालवत नव्हते. एक मोहीम जिंकली कि लगेच पुढची मोहीम त्याचे काय कारण? वेळ वाया घालवायचा नाही, कामाची गती कमी होऊ द्यायची नाही, शत्रू एका धक्क्यातून सावरतो न सावरतो तेवढ्यात दुसरा धक्का द्यायचा. आपण काय करतो? एक काम झाले कि शांत बसतो, खूप काही आता आपण केले आहे पुढे काहीही करायचं नाही, पुढे निवांत राहायचं, छोटा दुकान सुरु केलं आता बस त्यावरच राहायचं. नोकरी लागली आता बस पुढे काहीच करायचं नाही. इथेच तुम्ही चुकता.  आज जे काही आहे त्यापेक्षा उद्या वेगळं काहीतरी असायला हवं. आजपेक्षा उद्याचा दिवस खूप चांगला बनवायला हवा हाच विचार तुमच्या डोक्यामध्ये असायला हवा. छोट्या दुकानाला मॉल बनवण्यासाठी प्रयत्न करा. त्याच मॉल च्या अनेक ब्रांचेस कशा सुरु होतील याचा विचार करा. जोपर्यंत कामामध्ये सातत्य राहणार नाही, वेगळं काही करणार नाही तोपर्यंत यश मिळणार नाही, प्रगती होणार नाही.

३. प्रतिमा 

goodtherapy.org

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव सांगत कि हा देव आहे. कोणताही व्यक्ती महाराजांबद्दल वाईट बोलू शकत नाही किंवा विचारही करू शकत नाही. जनतेचं भलं करणे, परस्रीला मातेसमान मानने, स्वराज्याच्या प्रत्येक जातीधर्माचा आदर करणे, दिलेला शब्द कधीही माघार न घेणे हि होती छत्रपतींची प्रतिमा. समाजातील तुमची प्रतिमा तुमचे भविष्य ठरवते. आयुष्यात झालेली एखादी वाईट चूक, आयुष्यभर कमावलेली इज्जत शून्य करते. म्हणूनच स्वतःची प्रतिमा सांभाळा. प्रतिमेला अजून उजळवण्यासाठी प्रयत्न करा.

आशा करतो तुम्हाला महाराजांचे हे गुण आवडले असतील व हे सर्व गुण तुम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. हि माहिती सगळीकडे शेअर करा ज्यामुळे प्रत्येकजन महाराजांच्या पावलांवर चालण्याचा प्रयत्न करेल व ते यशस्वी बनतील. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *