Playstore वरील रेटिंग कमी झाल्यावर खरंच टिकटॉक भारतात बॅन होणार का..?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो टिकटॉक vs यूट्यूब सगळ्यांना माहितीच असेल. आणि आता असं वाटत आहे कि टिकटॉक विरुद्ध यूट्यूब असं जणू युद्धच सुरु आहे. टिकटॉक विषयी इंटरनेटवर खूप बातम्या देखील येत आहेत. परंतु यामध्येच प्लेस्टोर टिकटॉक ची रेटिंग पडताना आपण पाहतच आहोत.

काही दिवसांपूर्वी टिकटॉकची रेटिंग ४.५ इतकी होती आणि आता ती १.६ वर आली आहे. परंतु अचानक असं काय झालं कि टिकटॉकची रेटिंग एवढी लगेच घसरली.? आणि जास्त रेटिंग घसरल्याने टिकटॉक भारतात बॅन होऊ शकत..? चला तर या बद्दल थोडस जाणून घेऊया.


मित्रांनो टिकटॉकवरील फैझल सिद्दीकी याने टिकटॉक वर एक विडिओ पोस्ट केला होता आणि यानंतरच हे सर्व सुरु झालं. त्याने टाकलेल्या व्हिडिओमध्ये एका मुलीवर काही मुलं ऍसिड फेकताना दाखवलं गेलं होत. आणि यानंतर यावर असे आरोप झाले कि हा व्यक्ती ऍसिड अटॅक ला प्रोमोट करत आहे.

हा विडिओ आल्यानंतर खुपसाऱ्या सेलिब्रेटींनी यावर निषेध देखील केला होता. त्यानंतर राष्टीय महिला आयोग ने यावर गुन्हा दाखल केला. यानंतर ऍक्टर परेश रावल ने ट्विटर वर असेही ट्विट केले टिकटॉक बॅन करा.  जसे टिकटॉक वाल्यांना हे समजलं त्यावेळी त्यांनी लगेच फैझल सिद्दीकी च अकॉउंट बॅन केलं.

त्यानंतर सोशल मीडियावर टिकटॉकवर एक वेगळाच ट्रेंड सुरु झालाय. यानुसार या अँप ला १ स्टार देण्यास सुरुवात झाली आहे. भारतातल्या सर्व लोकांना आता वाटू लागली कि खरचं टिकटॉक बॅन झालं पाहिजे. २०१८ मध्ये इंडोनेशियामध्ये टिकटॉक वर बॅन आणलं होत. कारण तेथील खूप सारे लोक टिकटॉक वर अडल्ट कन्टेन्ट टाकत होती. तसेच खूप सारे अकाउंट्स अडल्ट कन्टेन्ट ने भरलेले आहेत ज्याला विनाकाही फिल्टर केल्याशिवाय आहेत आणि ते कोणीही पाहू शकतं.

तर मित्रांनो आपण पाहतच आहेत कि टिकटॉकची रेटिंग आता खूपच घसरली आहे आणि कोणत्याही अँप ची रेटिंग घसरणे म्हणजे त्या अँप च्या प्रोडक्शन वर खूप प्रॉब्लेम होतो. खूप असे लोक असतात जे अँप च्या रेटिंग पाहून त्या अँप ला डाउनलोड करतात, एखाद्या अँप ची रेटिंग कमी असेल तर लोकं त्या अँप ला डाउनलोड नाही करत. तसेच प्लेस्टोर वर त्या अँप च्या दिसण्यावरही फरक पडतो.

आणि एक्सपर्ट च्या म्हणण्यानुसार गुगल कमी रेटिंग वाल्या अँप ला प्लेस्टोर वरून काढून टाकतो आणि त्या अँप ला दुरुस्त करायला सांगतात. पण एखाद्या अँप ची रेटिंग कमी झाल्यावर त्याला बॅन नाही केलं जात. तर मित्रांनो टिकटॉक च्या बॅन होण्यावर आपण काय विचार करता..? टिकटॉक भारतात बॅन झाले पाहिजे का..? हे आम्हाला नक्की कळवा आणि हि माहिती आवडल्यास पुढे शेअर करायला नक्कीच विसरु नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *