नेमकं कुठून आलंय भारतीय रुपयाचं हे चिन्ह..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कोणत्याही देशाची currency त्यांची फायनान्शिअल कंडिशन सर्व दुनियेच्या समोर प्रदर्शित करत असते. आणि आपणास माहीत असेलच पूर्ण जगात सर्वात ताकदवान Currency म्हणून डॉलर ला मानले जाते. डॉलर चे एक चिन्ह आहे जे तुम्ही पाहिलेच असेल जे काही “$” या प्रकारे दिसते.
मित्रांनो ज्याप्रकारे डॉलर चं चिन्ह आहे त्याचप्रमाणे भारतीय रुपायांचा देखील एक चिन्ह आहे जे “₹” असे दिसते. पण तुम्हाला माहितेय का भारतीय रुपयांचे हे चिन्ह नक्की कुठून घेतले आहे..? तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या देशातील रुपायचं चिन्हांची निर्मिती मोठ्या प्रोसेस नंतर झालं आहे.
साल 2009 मध्ये भारतीय गव्हर्नमेंट ने भारतीय currency साठी एक चिन्ह बनवण्याची स्पर्धा ठेवली. आणि यासाठी त्यावेळी 3000 चिन्हे आली होती, त्यापैकी 5 चिन्हे निवडून मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात आले. त्यानंतर 2010 मध्ये भारतीय मंत्रिमंडळाने एक चिन्हाला निश्चित केले.
मित्रांनो या चिन्हांच डिजाईन “उदयकुमार धर्मलिंगम” ने बनवलं होतं. ते तामिळनाडू चे राहणारे आहेत आणि त्यावेळी IIT गुवाहटी मध्ये प्रोफेसर होते. मित्रांनो रुपायचं जे चिन्ह आहे ते देवनागरी लिपी आणि इंग्रजी अक्षराच मिश्रण आहे. आणि ₹ वर जी लाईन आहे ती अशोक चक्राचे प्रतीक बनवते. तर मित्रांनो रुपया जगातील पाचवी अशी currency बनली जिचे स्वतःची एक वेगळी ओळख आहे. याचप्रकारे श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ सारख्या देशातल्या currency ला देखील रुपये म्हणले जाते.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा, तसेच माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.