माणसांसारखे तोंड किंवा जीभ नसताना पोपट कसा बोलतो.? यामागचे कारण जाणून घेण्यासाठी जरूर वाचा.!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. निसर्गात अनेक चमत्कार घडत असतात. निसर्ग स्वतः एक मोठा किमयागार आहे. त्याचे उदाहरण म्हणजे प्राणी पक्षांचे मानवांची भाषा बोलणे. मित्रांनो तुम्हाला माहितच असेल माकड अगदी मानवा प्रमाणेच असतो हेच नव्हे तर माकड हा मानवाचा पूर्वज मानला जातो. त्याची जीभ, मान, गळा इत्यादी अवयव हे अगदी मानवा सारखे असतात.
परंतू तरी ही तो मानवा सारखे असतात तरी ही तो मानव प्रमाणे बोलू शकत नाही. तुम्ही कधी विचार केला आहे का पोपट माणसाप्रमाणे बोलू शकतो पण हे कसे शक्य होते पोपटाकडे मानवाप्रमाणे ना तोंड असते ना गळा ना जीभ ना ओठ मग नक्की या मागचे कारण काय हाच प्रश्न आता तुम्हाला पडला असेल ? परंतू चिंता करण्याची काही गरज नाही आहे आम्ही या प्रश्नाचे उत्तर तुमच्यासाठी या लेखा द्वारे घेऊन आलो आहे मित्रांनो हे उत्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख तुम्ही अगदी शेवट पर्यंत वाचा.
मित्रांनो माणसाला वाटते की आपण पोपटाला शिकवण देतो. सकाळी लवकर उठून त्याला आपण हे सगळे बोलयला शिकवतो म्हणून पोपट बोलू शकतो मात्र हे सत्य नाही आहे पोपट सोडल्यास कोणता ही दुसरा पक्षी माणसांप्रमाणे बोलू का नाही शकत ? फक्त पोपटच का माणसांप्रमाणे बोलतो. संशोधकांनी खूप अभ्यास केला व ते या निष्कर्षावर पोहचले की जो पोपट आहे त्याचा मेंदू हा इतर पक्षांपेक्षा वेगळा आहे.
पोपटाच्या मेंदूला दुसर्या पक्षांपेक्षा एक जास्त भाग असतो त्याला बाहेरील चक्र असे म्हटले जाते आणि या बाहेरील चक्राच्या मदतीने पोपट कोणता ही आवज अगदी सहजपणे कॉपी करु शकतात. कोणता ही आवज ते मिमीक म्हणजे नक्कल करु शकतात म्हणजेच या आवाजाची ते नक्कल करु शकतात. त्याच बरोबर पोपट एक सामजिक पक्षी आहे अगदी आधी पासूनच पिद्या दर पिद्या तो माणसांमध्ये राहत आला आहे.
म्हणूनच तो माणसांमध्ये लगेच मिसळून जातो व त्यांच्याशी मैत्री करतो. सोबतच तो माणसांच्या गोष्टींना त्यांच्या भावनांना समजून घेण्याचा प्रयन्त देखील करतो. म्हणूनच हळुहळू तो माणसांच्या आवाजाची कॉपी करु लागतो कारण तो माणसां मधलाच एक वाटवा अस त्याला वाटते म्हणून पोपट माणसांच्या आवाजाची कॉपी करु लागतो. म्हणूनच मित्रांनो जास्त काळ माणसांसोबत व्यतित केल्यामुळे व मेंदूमध्ये इतर प्राण्यांपेक्षा एक जास्त अवयव असल्या कारणाने पोपट माणसांची बोली व भाषा दोन्ही कॉपी करु शकतो बोलू शकतो.
हा एक निसर्गाचा चमत्कार आहे. निसर्ग देवतेने प्रत्येकाला काही ना काही तरी वरदान दिले आहे व आपल्या सभोवताली असणारा निसर्ग हा सुंदर आहे. काही लोक पोपटाला पिंजर्यामध्ये बंदी बनवून आपल्या घरची शोभा वाढवतात मात्र हे साफ चुकीचे आहे कोणत्या ही प्राण्याला बंदी बनवून ठेवल्यास तुम्हाला कायद्याद्वारे शिक्षा होवू शकते सोबतच 15000 रुपये दंड व 6 महिन्या साठी तरंग वास भोगावा लागतो.
पोपट हा निसर्गाचा पक्षी आहे त्याला या निसर्गातच झाडा झुडपांवर राहूदे तो तिथेच खूष राहू शकतो. सोबतच या प्राण्यांना राहण्यासाठी निवारा राहिलेला नाही जंगलतोड देखील वाढली आहे म्हणूनच आपण आता झाडे लावून या पशू पक्षांना निवारा दिला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.