मासे पाण्यामध्ये श्वास कसा घेतात.? पाण्याच्या बाहेर आल्यावर मासे म’र’ण का पावतात.?

मासे पाण्यामध्ये श्वास कसा घेतात.? पाण्याच्या बाहेर आल्यावर मासे म’र’ण का पावतात.?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या पृथ्वीतलावर ठिक- ठिकाणी विविधता आहे. आपल्या जगात सजीव कान्या-कोपर्यात आहेत. कोणी जमिनीवर कोणी हवेत तर कोणी पाण्यात. मात्र असे ही काही सजीव आहेत जे पाण्यात व जमिनीवर दोन्ही ठिकानी सुद्धा राहू शकतात उदाहरण द्यायचे झाले तर कासव व मगर हे प्राणी उभयचर आहेत हे जमीन व पाणी दोन्ही ठिकाणी वास्तव्य करु शकतात.

जे प्राणी जमिनीवर राहतात त्यांना भूचर म्हणतात जसे की गाय, बैल, मानव व इत्यादी सोबतच जे पाण्यात राहतात त्यांना जलचर प्राणी असे म्हटले जाते हो या वर्गीकरणात मासे बसतात. आपल्या परिसरात असे ही जीव आहेत जे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत त्यांना सूक्ष्म जीव असे म्हणतात. लहानपणी आपण एक गाण ऐकले होते

“मछल जल की रानी है
जिवन उसका पानी है
हात लगाओगे तो डर जायेगी
बाहेर निकलोगे तो मर जायेगी”

हो मासे जेव्हा पाण्याच्या बाहेर येतात ते काही क्षणातच मरण पावतात. मात्र असे का होते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का ? याचे उत्तर बर्याच लोकांना माहित नसेल आम्ही याच प्रश्नाचे उत्तर आम्ही तुमच्यासाठी या लेखा द्वारे घेऊन आलो आहे. हे उत्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख शेवट पर्यंत वाचा.

मित्रांनो जलचर प्राणी हे पाण्यात राहतात जर ते पाण्याबाहेर आले तर ते काही क्षणातच मारतात. निसर्गाने बनवलेला मासा हा अतिशय सुंदर प्राणी आहे. माश्याला पोहण्याची कला अवगत असते. मासे हे पाण्यात खूप कमी मात्रेत असलेला प्राणवायू श्वसन करतात मात्र हवेतील प्राणवायू शरीरात घेणे त्यांना काही जमत नाही. या मागचे कारण पुढिल प्रमाणे आहे.

मानवाच्या शरीरात श्वसनक्रिया संपन्न करण्यासाठी नाक, श्वसन नलिका व फुफुसे असतात. आपण नाका द्वारे प्राणवायू शरीरात घेतो श्वसन नलिके द्वारे तो शरीरात जातो व फुफुसांद्वारे सर्व शरीरात प्रचलीत होतो आणि घातक कार्बन डाय ऑक्साइडला शरीराच्या बाहेर केले जाते. आपली फुफुसे आपल्याला शरीराला हवेत श्वास घेण्यास मदत करतात. मात्र माश्यांना असे श्वसनासाठी लागणारे अवयव नसतात फुफुसांच्या ठिकानी माश्यांना कल्ले असतात.

हे कल्ले माशांना पाण्यात श्वास घेण्यासाठी मदत करतात. मित्रांनो मासे पाण्यात श्वास घेण्यासाठी पाण्यात मिसळलेल्या प्राणवायूचा वापर करतात. मासे श्वास घेण्यासाठी आपल्या तोंडाच्या मदतीने थोडे थोडे पाणी पीत राहतात याने त्यांना मुबलक प्राणवायू मिळत राहतो. हे पाणी कल्ल्यांच्या मदतीने माश्यांच्या संपूर्ण शरीरात प्राणवायू पोहचवतात. अश्या प्रकरे मासे पाण्यात श्वास घेतात. आपला निसर्ग हा जादूगार आहे या निसर्गाच्या सानिध्यात अनेक चमत्कारिक जीव राहतात. त्यांचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *