कैरी खाण्याचे हे आहेत सर्वात आरोग्यदायी फायदे..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कच्चे आंबे खाल्ल्याने कोणते फायदे होतात. कच्च्या कैरीमध्ये व्हिटॅमिन c मोठ्या प्रमाणात असते, तसेच कॅल्शियम, फोस्परस, मॅग्नेशियम असे शरीराला पोषक घटक असतात. तर आज जाणून घेऊया कैरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे.
कैरीमध्ये भरपूर प्रमाणात विटाकेरोटीन आणि व्हिटॅमिन A असतं. आंब्यात असणारे केरोटीनाईट्स त्वचा तजेलदार ठेवण्यास मदत करते. कैरीच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. कैरीत व्हिटॅमिन चा जास्त प्रमाणात स्रोत असल्याने शरीर हायड्रेट करण्यास मदत करते. उष्मघातापासून बचाव करण्यासाठी कैरी फायदेशीर असते.
अनियमित खाण्याच्या सवयीमुळे बऱ्याचदा पोटात आम्लता येते, ऍसिडिटी आज एक सामान्य समस्या बनलेली आहे आणि ती कैरीच्या सेवनाने दूर होण्यास मदत होते. कैरीच्या सेवनाने डोळ्याचे आरोग्य सुधारण्यास देखील मदत होते, व त्यामुळे दृष्टी उत्तम राहते तसेच रातआंधळेपणा दूर होण्यास मदत होते.
कच्च्या कैरीमधील ऑस्ट्रीजन गुणधर्म त्वचेवर तेल आणि मळ जमा होऊ देत नाही. एक कप पाण्यात कैरीचा फोड उकळा आणि हे पाणी रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावा. दुसऱ्यादिवशी उठल्यावर चेहरा गरम पाण्याने स्वच्छ धुवा, यामुळे चेहऱ्यावर थोडा फरक नक्कीच जाणवेल.
कैरीमध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते यामुळे एलक्ट्रोलयट्स चे प्रमाण राखण्यास मदत होते आणि रक्तदाबावर नियंत्रण राहते तसेच हृदय विकारावरील धोकाही कमी करता येतो. उन्हाळ्यात पित्ताचा किंवा मसालेदार पदार्थांचा त्रास होऊ नये म्हणून डाळीमध्ये किंवा आमटीमध्ये कैरीचा समावेश करा.
कैरीच्या योग्य सेवनाने शरीराला पोट्याशियमचा पुरवठा होतो. रक्तदाब नियंत्रण राखण्यास मदत होते, कैरीमधून फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.
तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका.
कैरी खाण्याचे फायदे चांगल्या प्रकारे सांगितले