रातोरात फेमस झालेल्या रानु मंडल वर आज उपाशी झोपण्याची आज वेळ का आली ?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांच स्वागत आहे. मित्रांनो असं म्हणतात ना अति तिथं माती, होय हे खरं आहे. रेल्वे स्थानकांवर गाणं गाणाऱ्या राणू मंडल चा एक विडिओ वायरल झाला आणि त्यांच्या आयुश्यात नवीन पहाट आली. देशभर त्यांचं कौतुक होऊ लागलं, अगदी सिनेमातून आणि विविध कार्यक्रमातून राणू मंडल यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचला. सोशल मीडियावर तर त्या खूपच फेमस झाल्या.

मित्रांनो असा एक माणूस नव्हता कि त्यांच्या व्हाट्सअप वर राणू मंडल चा विडिओ नव्हता. परंतु हि स्थिती आता पलटली आहे. त्यांना जे फेम भेटलं होतं ते त्यांना टिकवून ठेवता आलं नाही. त्यांचे पुन्हा जुने दिवस चालू झाले आहेत. लोकडाऊन च्या काळात २ वेळचं जेवण मिळणंही त्यांना आता कठीण पडू लागलं आहे. कधी एका वेळेच्या जेवणातही फक्त भात मिळत असल्याचं समोर आलेलं आहे. 
आसपासच्या लोकांनी त्यांना काही दिलं तेवढंच राणू मंडल खात असल्याचं सध्या समोर आलेलं आहे. नाहीतर त्या उपाशी झोपी जातात असे तिथल्या स्थानिकांच म्हणणं आहे.

रेल्वे स्टेशन वर गात असताना लता मंगेशकरजींचं गाणं गायलं होते ते म्हणजे  “एक प्यार का नगमा है.. ” त्यावेळीस कोणीतरी त्यांचा विडिओ काढला आणि तिथपासून त्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्या. आणि याचाच फायदा उठवत हिमेश रेशमिया यांनी त्यांच्या एका चित्रपटात गाण्याचा चान्स दिला आणि त्या रातोरात सुपरस्टार झाल्या. 
ज्या वेळेस रेणू मंडल रातोरात सुपरस्टार झाल्या तेव्हा त्यांचं वागणं सुद्धा बदलल. त्यांच्या मध्ये Attitude खूप आला. ते त्यांच्या चाहत्यांशी साधं नीट बोलतही नव्हत्या. त्याच्यामुळे बॉलीवूड मंडळी ज्यांनी राणू मंडल ला जवळ केलं होतं त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला कारण रातोरात सुपरस्टार झालेली राणू मंडल यांना व्यवस्थित वागायचं कसं हेच समजलं नाही. 

आणि मित्रांनो होत्याच नव्हतं झालं, राणू मंडल ला जेवढं फेम मिळालं ती क्षणातच गायब झाली. सध्या त्या पुन्हा रेल्वे स्टेशनवर गाणं गाऊ लागल्या आहेत. आणि आता त्यांची जेवणाची सुद्धा पंचायत झालेली आहे. 
या मधून सांगायचं हाच उद्देश आहे कि माणसानं आयुष्यामध्ये कितीही प्रसिद्धी मिळाली, पैसा आला तरी त्याचा अहंकार करू नये कारण अहंकारच घर एक दिवस नक्कीच खाली होतं . तर मित्रांनो तुम्हाला काय वाटत हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा .आणि हि माहिती तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करायला विसरू नका. 

Admin

One thought on “रातोरात फेमस झालेल्या रानु मंडल वर आज उपाशी झोपण्याची आज वेळ का आली ?

Leave a Reply

Your email address will not be published.