सॅनिटायजर लावल्यानंतर तो किती काळापर्यंत आपल्या हातांवर काम करतो..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कि सॅनिटायजरचा प्रभाव किती काळापर्यंत राहतो, आणि याचा वापर कधी आणि कसा केला पाहिजे. संपूर्ण जगात कोरोना व्हायरस पसरलेला आहे आणि लोकांना सुरक्षित राहण्यासाठी सॅनिटायजर वापरण्याचा सल्ला दिला जातोय.
सॅनिटायजर चा वापर करणे खूप सोप्पे असते परंतु लोकांच्या मनात एक प्रश्न येतो कि सॅनिटायजर आपल्या हातावर किती काळापर्यंत काम करतो..? तसं हा खूप साधा प्रश्न आहे. पण इन्फेकशन ला थांबवण्यासाठी खूप गरजेचं देखील आहे. मित्रांनो बाहेर निघताना आणि बाहेरून येताना आपल्या हातांना सॅनिटायज केले पाहिजे.
तुम्हाला माहितीच आहे कि लॉकडाऊन शिथिल केले आहे आणि अशामध्ये आपल्या आरोग्यावर लक्ष ठेवणं अजूनच गरजेचे झाले आहे. कारण मार्केट, डॉक्टर आणि कोणत्याही कामासाठी घरातून बाहेर निघाल्यावर आणि बाहेरून घरात जाण्यापूर्वी सॅनिटायज करणे या व्हायरस पासून आपल्याला वाचवू शकतो.
तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार या व्हायरस ला थांबवण्यासाठी सर्वात उपाय म्हणजे सॅनिटायजर चा वापर करणे. या व्हायरस पासून वाचण्यासाठी आपल्याला अशा सॅनिटायजर चा वापर केला पाहिजे ज्यामध्ये ६० टक्के अल्कोहोल असेल. परंतु आपल्याला सांगू इच्छितो कि सॅनिटायजर हा जास्त वेळेपर्यंत काम नाही करू शकत. आणि यासाठी साबण आणि पाण्यापासून हाथ धुणे जास्त फायद्याचे असते.
तसे हॅन्ड सॅनिटायजर हा व्हायरस पासून वाचण्यासाठी सोप्पा उपाय असतो. पण साबण आणि पाण्याने हाथ धुतल्याने सर्व किटाणू पाण्यासोबत निघून जातात. परंतु जेव्हा आपण सॅनिटायजर चा वापर करता तेव्हा हातावर असलेले किटाणू त्याच वेळी मरून जातात. पण जेव्हा आपण एखाद्या इन्फेक्टेड वस्तूंना हात लावतो तेव्हा हात पुन्हा घाण होतात. त्यामुळे हात किती वेळ स्वच्छ राहतील हे तुमच्या दुसऱ्या वस्तूंना शिवण्यावर अवलंबून असते.
जेव्हा आपण एखाद्या घाणेरड्या जागेला शिवतो तेव्हा आपण हात पुन्हा स्वच्छ धुतले पाहिजेत. काही खाल्ल्यांनंतरही आपले हात चांगले स्वच्छ धुतले पाहिजेत.
जेव्हा आपण सॅनिटायजर चा वापर करता तेव्हा संपूर्ण हात कव्हर करा आणि हात पूर्ण सुखेपर्यंत त्याला रगडा. जेव्हा आपले हात घाणेरडे असतात तेव्हा सॅनिटायजर काम नाही करत हे लक्षात घ्या, म्हणून हात आधी स्वच्छ साबण आणि पाण्याने धुतला पाहिजे. हात पूर्ण स्वच्छ होण्यासाठी साबणाला हातावर २० सेकंड चांगले रगडले पाहिजे.
तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.