या ५ चुकांमुळे तुमच्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते.

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. डायबिटीज का होतो  अनेकांना पडलेला एक प्रश्न आहे , याच प्रश्नाचं उत्तरआज आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्या खाण्यामध्ये चुकीचे पदार्थ आल्यामुळे आपल्या रक्तामध्ये साखरेचे प्रमाण वाढते. त्याचा परिणाम आपल्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वाढत असतं , कोलेस्ट्रॉल वाढते त्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होतो. त्याच्यानंतर आपल्याला मधुमेह  होतो. त्याच्यासाठी कोणत्या  चुका  नाही केल्या पाहिजेत त्याचीच माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

पहिली चूक म्हणजे शरीराची गरज भागवून मनसोक्त खाणे हि सगळ्यात मोठी चूक आहे. आपल्या शरीराला जेवढ्या आवश्यक पोषक घटकांची गरज असते तेवढंच मनुष्याने खाल्ले पाहिजे. जर आपण मनसोक्त खात असाल, आपल्या शरीराच्या गरजा सोडून आपण प्रमाणाच्या बाहेर खात असाल त्यामुळे व्हायचा तो परिणाम होतोच. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ग्लुकोजचे आणि साखरेचे प्रमाण वाढत जाते आणि डायबिटीज हा रोग आपल्याला कायमचा होतो. त्यामुळे तुम्ही आजपासूनच मनसोक्त खाणं सोडून द्या.

 दुसरी चूक म्हणजे प्रमाणाच्या बाहेर गोड पदार्थ खाणे. मित्रांनो गोड पदार्थ खाणे हेसुद्धा चुकीचं आहे. तुम्ही जर प्रमाणाच्या बाहेर सारखं गोड पदार्थ खात असाल तर ते सुद्धा अत्यंत चुकीचं आहे. तुम्ही अजिबात गोड पदार्थ खाऊच नका.

तिसरी चूक म्हणजे भरपूर प्रमाणात नॉनव्हेज खाणे. मित्रांनो असे म्हणतात जे प्राणी जिभीन्न प्राणी प्राशन करतात अशांनाच नॉनव्हेज खाण्याचा अधिकार परमेश्वराने दिला आहे. परंतु सध्या शाकाहारी प्राणी सुद्धा भरपूर प्रमाणात नॉनव्हेज खात आहे आणि ते पचवण्यासाठी शरीराला खूप उद्योग करावा लागतो. जर तुम्ही भरपूर प्रमाणात नॉनव्हेज खात असाल तर त्याचा परिणाम आपल्या शरीराला होतोच. त्यामुळे तुम्ही जास्त प्रमाणात नॉनव्हेज खात असाल तर ते आत्ताच सोडून द्या.

चौथी चूक म्हणजे प्रचंड प्रमाणात वजन वाढवणे. मनसोक्त खाण्यामुळे तुमचा नियमित जर व्यायाम नसेल वजन वाढतच असते. प्रचंड प्रमाणात तुमचं वजन जर वाढलं आणि ते तुम्हाला कंट्रोल नाही करता आलं तर तुम्हाला १००% डायबिटीज होऊ शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या शरीराचं वजन अवश्य वाढवू नका.

आणि शेवटची चूक म्हणजे सतत चहा पिणे. सततचं चहा पिण्याचं प्रमाण भरपूर असते आणि ९० टक्के प्रमाण हे चहा साखरेचं असत. तुम्हाला जर चहा पिण्याची  सवय असेल तर ती आताच सोडून द्या. सतत चहा पिल्याने आपल्या शरीरातील ग्लुकोजचं प्रमाण वाढत आणि ते आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे.

जर तुम्हाला आयुष्यात कधीच डायबिटीज होऊ द्यायचा नसेल तर मित्रांनो या पाच चुका तुम्ही कधीच करू नका, तसेच हि माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *