भारतीय रेल्वे नक्की किती मायलेज देते.? हे जाणून तुम्हीही भारावून जाल..!
भारतीय रेल्वे जी दररोज लाखो लोकांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवते. तीच रेल्वे जिच्या भरोशावर आपण दूरवरचा प्रवास करू शकतो. आपण सर्वांनी कधी न कधी रेल्वेने प्रवास केला असेलच पण तुम्ही कधी असा विचार केला आहे कि हि रेल्वे किती मायलेज देते? तर आज आपण या बद्दलची माहिती घेणार आहोत.
भारत सरकार आता सर्वच रेल्वे इलेक्ट्रिक ऑपरेटेड करत आहे. कारण यांच्यातून असा फायदा होतो कि डिझेलची बचत होते. पण ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक सुविधा उपलब्ध नाही अशा ठिकाणी डिझेल ट्रेन चालत आहे.
रेल्वेच्या डिझेल टॅंक ला तीन भागात विभागले गेले आहे. त्याच्या क्षमतेनुसार त्याचे तीन वेगवेगळे प्रकार आहेत.
पहिला आहे ५००० लिटर डिझेल टॅंक, दुसरा आहे ५५०० लिटर आणि तिसरा ६००० लिटर चा डिझेल टॅंक.
याच डिझेल इंजिन चे एव्हरेज त्या ट्रेन मध्ये असलेल्या लोड वॉर अवलंबून असते.
सरासरी जर रेल्वे २४ डब्ब्यांची असेल तर १ किमी प्रवास करण्यास ६ लिटर डिझेल लागते म्हणजेच ६ लिटर प्रति किमी त्याचे एव्हरेज येते.
जर १२ डब्ब्यांची पॅसेंजर ट्रेन असेल तर तिला सुद्धा ५.५ ते ६ लिटर प्रति किमी डिझेल लागते. कारण प्रत्येक स्टॉप वर हि पॅसेंजर ट्रेन थांबत असते. वारंवार ब्रेक दाबणे व थांबलेली ट्रेन Accelerate करून पुन्हा स्पीड वाढवणे या मध्ये जास्त इंधनाचा वापर होतो. त्यामुळे मायलेज कमी मिळते.
त्याच ठिकाणी जर १२ डब्ब्यांची ट्रेन हि एक्सप्रेस असेल व ती ट्रेन वारंवार स्टॉप घेत नसेल तर तिचे मायलेज ४.५ लिटर प्रति किमी मिळेल. म्हणजेच जेवढी ट्रेन एक्सप्रेस असेल आणि जेवढे वजन त्या ट्रेन मध्ये कमी असेल तेवढे ट्रेन चे मायलेज जास्त मिळते.
तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.