लक्ष्याची मुलगी आत्ता झालीय खूप मोठी, दिसतेय खूपच सुंदर!

९० च्या इरातील लक्ष्मीकांत बेर्डे हे सुपरस्टार अभिनेते होते. त्यांच्या विनोदाच्या शैलीने तर प्रेषक खळखळून हसायचे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांचे सह कलाकार अशोक सराफ हि जोडी महाराष्ट्रातील आवडती जोडी होती. दोघांच्या अभिनयाने आणि विनोदाच्या शैलीने महाराष्ट्राला खळखळून हसवले. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी आपल्या हसवण्याबरोबरच आपल्या अभिनयाच्या कौशल्याने बऱ्याच वेळा लोकांच्य्या डोळ्यात पाणी देखील आणलं.
२००४ मध्ये विनोदाचा बादशाह आणि मराठी चित्रपट सृष्टीचा हिरा सगळ्यांनाच पोरके करून गेला.

लक्ष्मीकांत बेर्डे जरी जग सोडून गेले असले तरी प्रेषक त्यांचे चित्रपट पाहून त्यांची आठवण काढत असतात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाविषयी जाणून घेण्याची प्रेक्षकांची खूप इच्छा असते. म्हणूनच आज आपण त्यांच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत.

लक्ष्मीकांत बेर्डे यांची २ लग्न झालेली आहेत. त्यांचं पाहिलं लग्न “रुही बेर्डे” यांच्याशी झालं होत. पहिला विवाह झाला असताना देखील त्यांनी दुसरा विवाह केला. चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री त्यांची सहकलाकार “प्रिया बेर्डे अरुण “यांच्याशी त्यांनी दुसरं लग्न केलं.

marathicelebs.com

प्रिया बेर्डे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांना २ मुलं  आहेत. त्यांच्या मुलाच नाव अभिनय बेर्डे आणि मुलीचं  नाव स्वानंदी बेर्डे असं आहे. स्वानंदी बेर्डे हि सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. इंस्टाग्राम अकाउंट ला ती तिचे मॉडर्न फोटो टाकत असते. स्वानंदीच्या जन्म २७ जुलै रोजी पुण्यामध्ये झाला आहे. तिचे शालेय शिक्षण Sinhagad Residential Public School मधून झाला आहे. शालेय शिक्षण संपल्यानंतर तिने कॉलेज च शिक्षण घेतलं.
स्वानंदी खूपच मॉडर्न आहे आणि तिचे विचार देखील मॉडर्न आहेत. तिचा भाऊ अभिनय बेर्डे देखील मराठी चित्रपट सृष्टीत काम करत आहे. त्याने “ती सध्या काय करते” या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *