भाऊ कदम यांचा जुळा भाऊ – पहिल्यांदाच आला सर्वांसमोर!

चला हवा येऊ द्या या कॉमेडी शो मधून प्रेक्षकांना खळखळवून हसवणारा, त्यांचे सर्व दुःख विसरायला लावणारा आणि तुफान मनोरंजन करणारा अभिनेता “भालचंद्र कदम”  अर्थात लाडक्या भाऊ कदमचा एक फोटो सध्या शोषलं मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या फोटो मध्ये भाऊ कदम सोबत आणखी एक व्यक्ती पाहायला मिळते. विशेष म्हणजे या दोघांच्या दिसण्यात बरचं साम्य आहे.

भाऊ कदम ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा फोटो शेअर केलेला आहे. फोटोमध्ये हुबेहूब भाऊंसारखा दिसणारा व्यक्ती हा त्याचा मोठा भाऊ आहे. मोठया भावाच्या वाढदिवसानिमित्त भाऊने हा फोटो पोस्ट करत त्याला शुभेच्छा दिल्या. या फोटोवर अनेकांनी जुडवा, सेम टू सेम अशा प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

twitter.com

शूटिंगच्या वेगळ्या वेगळ्या पत्रकामुळे भाऊला आपल्या कुटुंबाला फारसा वेळ द्यायला मिळत नाही. पण शूटिंग नसताना तो आपल्या कुटुंबासोबत निवांत वेळ अवश्य घालवतो.

भाऊ व ममता यांच्या सुखी संसारात त्यांना ३ मुली देखील आहेत. मृण्मयी , संचिती आणि समृद्धी अशी भाऊंच्या लाडक्या लेकींची नावं आहेत. इतकं यश , प्रसिद्धी मिळूनही भाऊ कदम मधील साधेपणा आजही कायम आहे.
त्यामुळे साधं राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे भाऊ कदम रसिकांचा लाडका बनला आहे.

हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना नक्की शेअर करा. 

Admin

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *