अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलाचं काम पाहून तुम्ही पण चकित व्हाल!

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या मराठी कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टी खूपच गाजवली. बऱ्याच वर्षांनंतर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी मराठी कलाविश्वात एंट्री केली आहे. झी मराठी वरील अगं बाई सासूबाई या मालिकेने अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या मालिकेला झी मराठी सोहळयात सर्वात जास्त पुरस्कार मिळाले आहेत.

या मालीकेत निवेदिता सासूबाई म्हणजेच आसावरीची मुख्य भूमिका साकारत आहे. आपल्या सहज सोप्प्प्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे. तर आज आपण निवेदिता सराफ यांच्या परिवाराबद्दल जाणून घेणार आहोत.

अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांना एकुलता एकच मुलगा आहे. त्याचे नाव अनिकेत सराफ असून सर्वजण त्याला “निक” या नावाने ओळखतात. निवेदिता सराफ यांनी निक च्या जन्मांनंतर सिनेसृष्टीतून काढता पाय घेतला. मुलाच्या जन्मानंतर १४ वर्ष त्या मराठी कलाविश्वात त्या कुठेच दिसल्या नाहीत. त्यांना आपल्या मुलासाठी वेळ काढून तो वेळ आपल्या मुलासाठी द्यायचा होता.

divyamarathi.bhaskar.com

आता हा अनिकेत खूपच मोठा झाला असून तो आता असं काही करतोय ते ऐकून तुम्हाला देखील आच्छर्य वाटेल.  खार पाहायला गेलं तर अभिनेत्याची मुलं देखील अभिनेतेच होतात असं आपण पाहिलं आहे.

परंतु खूपच अशी मुलं आहेत जी स्वतःच विश्व् स्वतःच निर्माण करू पाहत आहेत. त्यातील एक अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत.

अनिकेत सराफ हा शेफ आहे. त्यांनी दादर कॅटरिन कॉलेज मधून शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणस्थितो फ्रांस ला गेला. तिथे गेल्यानंतर त्याने पाककला कृतीचे शिक्षण घेतले. तेथील शिक्षण संपल्या नंतर परत तो भारतात आला.

आता तो रेसिपी चे विडिओ बनून आपल्या Youtube चॅनेल वर अपलोड करतो. तो चार पाच वर्षांपासून हे काम करत आहे. त्याच्या चॅनेल चे नाव गेट करीड असं आहे. त्या चॅनेल वॉर १० लाखांपेक्षा जास्त Subscribers आहेत.

आई वडिलांच्या विश्वात जगणं खूप सोप्प असतं . म्हणून सर्वजण आपल्या आई वडिलांच्या पायावर पाय ठेवत त्यांच्या विश्वाला आपलं विश्व् मानतात. परंतु अनिकेतने या सर्वांपेक्षा काहीतरी हटके करून दाखवलं आहे. 

मित्रांनो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना नक्की शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *