रायगडावर मोठे बलाढ्य हत्ती कसे नेले? मोठे दगड रायगडावर कसे आणले?

आपल्यापैकी अनेकजण रायगडावर गेले असणार. पण जे गेले नसतील त्यांना सांगू इछीतो रायगडावर रिकामीही चढणे खूप अवघड असते साधी पाण्याची बाटली सुद्धा भरलेल्या पोत्यासारखी वाटू लागते. अशा या उंच व उभ्या गडावर एवढे मोठे हत्ती कसे नेले असतील हा प्रश्न सर्वांना पडतो. हा गड मोठ्या मोठ्या हत्तीसारख्या दगडांनी बांधला असेल असाही प्रश्न पडतो.

३००० फुटापेक्षा जास्त उंची असलेल्या या रायगडावर एवढे मोठे दगड कसे नेले? हिरोजींनी चाणाक्षपणे एक गाढ बांधण्याचा प्लॅन केला त्या मध्ये असा विचार करण्यात आला कि जर ३५० इमारती गडावर बांधायच्या तर पाणी सुद्धा खूप लागेल. म्हणून विहीर व तलाव खोदण्यात आले. पाणी अडवा आणि पाणी जिरवा अशा मोहिमेतून  पाण्याचा चांगला  साठा झाला.

त्यातून जे दगड निघाले ते बांधकामासाठी वापरण्यात आले. हा गड डोंगरावर असल्यामुळे तलाव खोदताना सर्व काही दगडच लागत होते. मातीचे प्रमाण खूपच कमी होते अशाप्रकारे एका दगडात दोन पक्षी मारण्यात आले. म्हणजेच इमारतीसुद्धा त्या दगडांतून बांधण्यात आल्या तर दगडांचा वापर झाला. त्याचबरोबर पाण्याचा साठाही झाला.

शिवरायांच्या राज्याभिषेकाला एवढे हत्ती कसे आले?

amazone.in

राज्याभिषेकावेळी अनेक लोक उपस्थित होते. अनेकांच्या मनात एकाच प्रश्न येत होता. सामान्य माणूस गडावर येऊ शकत नाही पण एवढे बलाढ्य हत्ती कसे आले? जेव्हा गडाचे काम सुरु झाले तेव्हा काही वर्षातच छोटे हत्तीचे पिल्ले गडावर आणण्यात आले व जेव्हा ते मोठे झाले तेव्हा ते बलाढ्य व प्रचंड शरीरुष्टीचे दिसू लागले. म्हणूनच म्हटले जाते शिवरायांना भविष्य दिसते. प्रचंड अशी त्यांची दूरदृष्टी होती.

जर तुम्हाला हा ब्लॉग आवडलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना नक्की शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *