हैदराबाद एन्काऊंटरमागे व्ही.सी. सज्जनार, यांनी सांगितला एन्काऊंटर कसा केला.
हैद्राबाद मध्ये महिला डॉक्टर वर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. हैद्राबाद पोलिसांना या चारही आरोपींची पोलीस कोठडी मिळाली होती. पोलीस चौकशी करत असताना या चारही आरोपींना पहाटे साडे तीन वाजता घटना स्थळावर माहिती मिळवण्यासाठी आरोपींना त्याच ठिकाणी घेऊन गेले. जिथे त्यांनी बलात्कार केला आणि जिवंत जाळले. घटनासथळी संपूर्ण घटनेची माहिती मिळवत असताना आरोपींनी पोलिसांवर हल्ला केला. आणि तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
सायबराबाद चे पोलीस आयुक्त V. C. Sajjnar म्हणाले कि आरोपींची गुन्हा कसा केला आहे हे विचारत असताना त्यांनी आमच्यावर हल्ला केला आणि घटनास्थळापासून पळ काढण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना शरण यायला सांगितलं तरीहि ते थांबले नाहीत. दुसरा कोणताही पर्याय नसल्याने आम्हाला त्यांच्यावर गोळीबार करावा लागला. आणि या गोळीबारात त्या चारही आरोपींचा मृत्यू झाला.
२७ नव्हेंबर च्या रात्री आरोपींनी पीडितेवर ज्या ठिकाणी सामूहिक बलात्कार केला आणि तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला त्याच ठिकाणावर आरोपींना ठार करण्यात आलं आहे. शादनगर येथील चटनपल्ली गावाजवळ बेंगलोर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील पुलाखाली हि चकमक झाली. व चारही आरोपींना गोळ्या घालून ठार मारण्यात आले.
दर्जामराठी कुटुंबाकडून हैदराबाद पोलिसांना मानाचा मुजरा. _/_
तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीना शेअर करायला विसरू नका.