तुझ्यात जीव रंगला मालिकेमधील सुरज अडकला विवाहबंधनात! | Tujhyat Jeev Rangala
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील सनी दा ची भूमिका साकारणारा अभिनेता राज हंचनाळे विवाहबंधनात अडकला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राज हंचनाळे रानादा चा भाऊ सनीदा ची भूमिका साकारत आहे. त्याला प्रेमाने सर्वजण सुरज देखील म्हणतात. Tujhyat Jeev Rangala या मालिकेत सुरज चे लग्न नंदिताशी झाले आहे. नंदिताने केलेल्या खुरापतीमुळे तिला तुरुंगाची हवा खायला पाठवण्यात आले आहे.
सुरज आपला भाऊ राणा च्या पाठी कायम उभा असतो. सुरज म्हणजेच राज हंचनाळे खऱ्या आयुष्यात देखील विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. सर्वजण राज ला लग्नासाठी खूप शुभेच्या देत आहेत.
अभिनेता राज हंचनाळे च्या पत्नीचे नाव मॉली असून ते खूप दिवसांपासून रिलेशनशिप मध्ये होते. मॉली हि मूळची हरियाणाची आहे. अभिनेता राज हंचनाळे आणि मॉली यांचा प्रेमविवाह रत्नागिरीमध्ये पार पडला. अभिनेता राज हंचनाळे याची पत्नी एक Certified Fitness Trainer आहे. त्याशिवाय तिला योग करायला खूप आवडतो. ती एक Sktech आर्टिस्ट देखील आहे. फोटोग्राफी ची देखील तिला खूप आवड आहे.
तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली राज हंचनाळे आणि मॉली ची जोडी.. ? ते आम्हाला कंमेंट मध्ये लिहून पाठवा
आणि हि माहिती जर का तुम्हाला आवडली असेल तर मित्रमैत्रीणीना शेअर देखील करा.