Fandry चित्रपटातील शालू बद्दल खूप काही, आत्ता दिसतेय खूपच सुंदर!

Fandry या चित्रपटाच्या माध्यमातून नावारूपास आलेली हि अभिनेत्री म्हणजे राजेश्वरी खरात. या चित्रपटात तिने शालूची भूमिका साकारली होती. फ्यांड्री या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे  यांनी केले असून या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. या चित्रपटात शालूचा आपल्याला एकही डायलॉग आपल्याला ऐक्याला मिळत नाही. तिचे फक्त हावभाव च सगळं काही सांगून जातात. तर आज आपण फॅन्ड्री या चित्रपटातील Rajeshwari Kharat बद्दल जाणून घेणार आहोत.

राजेश्वरीचा जन्म ८ एप्रिल १९९८ रोजी पुण्यात झाला. तिने आपले शालेय शिक्षण जोग एडुकेशन ट्रस्ट मधून पूर्ण केले असून आता ती सिंहगड कॉलेज मध्ये BSC मध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. राजेश्वरीचे वडील बँकेत नोकरी करत असून आई हाऊसवाईफ आहे. राजेश्वरीने कधीच विचार केला नव्हता कि ती फिल्म इंडस्ट्री मध्ये येईल. तिचा आणि कलाक्षेत्राचा लांब लांब पर्यंत कोणताच संबंध येत नव्हता. तिच्या कुटुंबातील कोणीच या क्षेत्रात उतरलं नव्हतं. पण नशिबाने राजेश्वरी खरात एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री बनली.

२०१४ मध्ये फॅन्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून तिने मराठी चित्रपट सृष्टीत पाहिलं पाऊल टाकला. या चित्रपटात तिने शाळेतील मुलगी शालूची महत्वपूर्ण भूक साकारली आहे. या चित्रपटात तिचा एकही डायलॉग नसतानाही तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. पहिल्याच चित्रपटामुळे ती खूप लोकप्रिय ठरली. फॅन्ड्री चित्रपटासाठी मेकर्स शालूच्या भूमिकेसाठी एक लहान मुलगी शोधत होते. तेव्हा त्यांना पुण्यात राजेश्वरी दिसली आणि त्यांनी तिच्या घरचा पत्ता शोधून तिला चित्रपटात काम करण्यासाठी तिच्या आई वडिलांना राजी केलं.

dreampirates.in

राजेश्वरीचा खरा प्रवास सुरु झाला तो फॅन्ड्री या चित्रपटाच्या माध्यमातून, आणि तिचे नशीबच बदलले. आणि नंतर तिचा २०१७ मध्ये तिचा Itemgiri हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला परंतु तिचा हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर धम्माल गाजवू शकला नाही. अभिनेत्री राजेश्वरी खरात हिच्या राहणीमानात देखील खूपच बदल झाला आहे. आता ती खूपच मॉडर्न झाली असून ती अतिशय सुंदर दिसत आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रीणीना देखील शेअर कार्याला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *