नवऱ्याचा संशयी स्वभावाने त्याने बायकोसोबत जे केले ते पाहून तुम्हीसुद्धा हादरून जाल.!

नवऱ्याचा संशयी स्वभावाने त्याने बायकोसोबत जे केले ते पाहून तुम्हीसुद्धा हादरून जाल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या जगात अनेक प्रकारची माणसे राहतात, काही प्रेमळ काही मन मिळावू तर काही संशयी. संशय अशी कीड आहे जिने एखाद्याच्या मनात जर घर केले तर त्या माणसाच्या संसाराला आग लागण्यास वेळ लागत नाही. संशयी माणसे अत्यंत घतकी असतात कोणता ही विचार न करता ते कधी-कधी हिंसेवर सुद्धा उतरतात. तुम्ही विचार करत असाल आम्ही तुम्हाला हे सगळं नक्की कशाबद्दल बोलत आहोत. चला तर आत्ता मूळ मुद्यावार येवूया आणि पाहूया सुमन आणि तिच्या संशयी नवऱ्याची कहाणी.

बायकोसाठी नवरा हाच तिचा ईश्वर असे मानणारी साधी-सरळ अशी सुमन रोज सकाळी लवकर उठायची नवऱ्यासाठी डबा बनवून घरच्या कामाला ती सुरवात करत असे. आई लहानपणीच गेल्यामुळे तिला तिच्या बाबांनीच चांगले संस्कार देवून लहानाची मोठी केले. मागे लहान दोन बहिणी आणि त्यांची जिम्मेदारी यामुळे कमी वयातच तिला लग्न करावे लागले.

खरं तर तिला खूप शिकायच होत बाबांना व्यवसायात मदत करायची होती परंतू लग्न झाले आणि तिचे सगळे विश्वच बदलले. नवरा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक होता आणि काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघातात ‘मृ’त्यू’ झाला, त्यामुळे घरात फक्त दोनच व्यक्ती सुमन आणि तिचा नवरा. सुमनचा नवरा आधीपासूनच घुम्या त्यामुळे त्यांच्यात जास्त संवाद होत नसे. नवरा बरीक-सारीक गोष्टींमध्ये चूक काढून तिच्यावर शब्दांचा भडिमार करत असे, कधी भाजी वरुन तर कधी डाळीमुळे कधी तिखटा वरुन तर कधी मीठावरुन. बाहेर कोणाच्या घरी जायचं नाही कोणाशी बोलायच नाही अशी सक्त तकिद नवऱ्याने सुमनला देऊन ठेवली होती.

पण काही दिवस सुमनच्या नवऱ्याचा अतिरेक जरा वाढला होता, तो तिला ‘मा’र’हा’ण’ करु लागला होता. कमाला जाताना रुमाल न दिल्याबद्दल रात्री कामावरुन आल्यावर त्याने थाडकन सुमनच्या कानाखाली मारली सुमन खाली पडली थोड्या वेळाने ती रडत उठली व जेवणास लागली.

तिचे जिवन नरका-समान झाले होते. उन्हाळ्याच्या दिवसात एकदा नवरा कामावर गेल्यानंतर गरमी होत असल्या करणाने सुमनने दरवाजे आणि खिडक्या उघडल्या आणि बाजूच्या आजीकडे बघून हसली त्याच वेळी तिचा नवरा विसरलेली ऑफिसची फाईल घेण्यासाठी परत आला तिला हसताना पाहून त्याचा पारा चढला, त्याने तिच्या दरवाजाच्यातच कानाखाली मारली आजू-बाजूची माणसे फक्त बघ्याची भुमिका करत होते.

कानाखाली मारल्यानंतरही तो थांबला नाही खाली पडलेली झाडू उचलून जोरात पाठीत मारली डब-डबलेल्या आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांना लपवीत ती घरात गेली. आतमध्ये गेल्या वर सुद्धा नवऱ्याने मोठ्या आवाजात विचारले कोणाला बघून हसत होतीस? कोणा सोबत लफडे चालू आहे तुझे? थांब आज तुला ‘मा’रु’न’- ‘मा’रु’न’ सुतासारखी सरळ करतो.

सुमन नवऱ्यासमोर आज पुर्णपणे हरली होती तिने थेट पोलिस स्थानक गाठले आणि रितसर तक्रार नोंदवली व नवऱ्याच्या हिं’सेतून मुक्त झाली. आता सुमन अशाच महिलांना मदत करते. मित्रांनो संशयाने फक्त घरे उध्वस्त होतात म्हणून ही कीड आपल्या डोक्यातून थोडी लांबच ठेवत जा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *