पूजा पाठ करून देखील माणूस दुःखी का असतो.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

पूजा पाठ करून देखील माणूस दुःखी का असतो.? ९९% लोकांना माहित नसलेलं सत्य.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्यापैकी अनेक जण देवी-देवतांची, भगवंतांची पूजा विधी करत असतात. दिवसभरातील अनेक वेळ भगवंताच्या चरणी व्यतीत करत असतात. आपल्यापैकी अनेक जण देवपूजा भरपूर मनापासून करत असतात परंतु काही जणांचे असे म्हणणे असते की आम्ही दिवसभर देवपूजा करत असतो ,देवाची पूजा अर्चना करत असतो तरीही सुद्धा आमच्या जीवनामध्ये अनेक दुःख का? काहीजण देवपूजा सुद्धा करत नाही, देवाची आराधना सुद्धा करत नाही.अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये नेहमी आनंद आनंद का असतो? एक व्यक्ती होता.

तो नेहमी पूजा विधी करत असे, देवांची मनोभावे प्रार्थना करत असत परंतु एकदा त्याच्या मनामध्ये प्रश्न आला आपण सर्व गोष्टी मनापासून करतो तरीही आपल्या जीवनामध्ये अनेक दुःखे का आहेत?. अशा वेळी ती व्यक्ती देवाकडे नेहमी प्रार्थना करत असते की मला या गोष्टी हव्यात ,मला त्या गोष्टी हव्यात.मला नेहमी सुख शांती हवी. दुकानांमध्ये गिऱ्हाईक भरपूर प्रमाणामध्ये यायला हवी परंतु असे काही होत नसे कारण की ती व्यक्ती देवपूजा करत असताना निर्मळ मनाने कधीच करत नसे.काही ना काही सतत भगवंतांकडे मागत असे. देवाकडे मागितलेली गोष्टी आपल्याला मिळाल्या नाहीत तर आपण निराश होतो आणि देवालाच दोष देऊ लागतो.

देवाला दोष देणाऱ्या व्यक्ती नेहमीच दुखी असतात. सर्वात आधी आपण देवपूजेचा करणारा देखावा आधी बंद करायला हवा. त्याचबरोबर परमेश्वरा सोबत सौदेबाजी सुद्धा करणे बंद करा. देव काही दुकान नाही की आपल्याला हव्या त्या वस्तू आपण दुकानातून घेऊ. आपल्यापैकी अनेक जण नवस करत असतात. मला हे मिळाले तर मी असा नवस करणार मला ते मिळाले तर तसा नवस करेल. परमेश्वराकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत परमेश्वर आपल्या दृष्टीने काही भुकेला नाही.

या पृथ्वीतलावर असे सुद्धा अनेक भक्त आहेत जे मनापासून देवाची पूजा करत असतात कोणत्याही प्रकारची भावना मनामध्ये न ठेवता भगवंताची पूजा आराधना करत असतात. ज्या नास्तिक व्यक्ती असतात ते भगवंताची पूजा-अर्चना करत नाही परंतु ते नेहमी प्रयत्नशील असतात. प्रत्येक कार्यासाठी ते प्रयत्न करत असतात. स्वतःच्या जिद्दीवर व मेहनतीवर पुढे जात असतात.कधीच कुणावर अवलंबून राहत नाहीत. परंतु ज्या व्यक्ती देवाची पूजा अर्चना करत असतात अशा व्यक्ती सर्व गोष्टी देवा वर आधारित राहतात. स्वतः मात्र काहीच प्रयत्न करत नाही.

थोडे काही अपयश मिळाले तर प्रयत्न करत नाही आणि लगेच देवाला दोष देत राहतात. भगवंताची पूजा केलेली कधीच वाया जात नाही, भगवंत आपल्याला कोणत्या रूपामध्ये कधी आपल्याला दर्शन देतील हे सांगता येत नाही. भगवंत आपल्या इच्छेने व आपल्या मर्जीने आपल्या भक्तांना नेहमी फळ देत असतात व त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करत असतात. याकरता भगवंतांची पूजा करावी पण आपले प्रयत्न नेहमी असायला हवे.आपण आपल्या प्रयत्न च्या आधारे आपल्याला यश प्राप्त करायला हवे.

आपण देवपूजा करत असताना परमेश्वर यांच्याकडे एक प्रार्थना करायची आहे, हे परमेश्वर मला प्रयत्न करण्याची शक्ती दे. माझ्या प्रयत्नांना यश दे. जरी काही अडथळे त्यामध्ये आले तरी मला धीर संयम प्राप्त करण्याची शक्ती दे आणि मी जे काम करेल ते काम मनापासुन पूर्णपणे होऊ दे अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे. सर्वांशी प्रेमाने एकनिष्ठतेने मिळून मिसळून राहावे जेणेकरून तुमचा व्यवसाय व्यापार सुद्धा तेजी मध्ये राहील.

जो व्यक्ती सर्वांशी नम्रतेने वागतो ,बोलतो अशा व्यक्तीला नेहमी जीवनामध्ये आदर सन्मान मिळत असतो. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नेहमी यश प्राप्त होत असते. आनंद आपण इतरांना जेवढा वाटत असतो तेवढाच दुप्पटीने आपल्याला पुन्हा सुद्धा मिळत असतो. आपल्यापैकी अनेक जण आहेत जे कामामध्ये यश मिळाले नाही तर बाबा महाराज यांच्याकडे जात असतात त्यांनी सांगितले टोटके मंत्र यांचा वापर करत असतात आणि त्यामध्ये ही जर या मंत्राद्वारे यश मिळाले तर त्या बाबांच्या हातापाया पडत असतात.

हे अत्यंत चुकीचे आहे यामुळे तुमची शक्ती आणि तुमची बुद्धी सुद्धा व्यर्थ होत असते म्हणून तुम्ही जे काम हातामध्ये घ्याल ते अतिशय प्रामाणिकपणे पूर्ण करा आणि इतरांशी नेहमी व्यवस्थित वागा. अनेकदा या सगळ्या गोष्टींमुळे मनुष्य दुःखी होत असतो आणि म्हणून पूजापाठ करून सुद्धा माणूस दुखी असतो म्हणून सदैव पूजा-अर्चना करत असताना सच्चे मनाने देवाला शरण जा. देव तुमच्या सर्व हाका ऐकेल आणि तुम्हाला योग्य वेळ आल्यावर तुमच्या नशिबामध्ये जे असेल ते तुम्हाला अवश्य तुम्हाला देईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *