महाराष्ट्रातही कोरोना दाखल, सावधान..! परदेशातून आलेल्या लोकांपासून शक्यतो दूरच रहा.

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो कोरोना व्हायरस आता महाराष्ट्रात देखील दाखल झाला आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. यामध्ये गेल्या विशेषतः गेल्या महिनाभरात परदेशातून आलेल्या लोकांपासून दूर राहा. मग हे  लोक परदेशी असो किंवा आपल्या देशातील. 

जे आता नजीकच्या काही दिवसांमध्ये परदेशातून जाऊन आले आहेत त्या व्यक्तींपासून दुरी ठेवा. कारण जे परदेशातून येत आहेत त्यांनाच कोरोना व्हायरस झाल्याचं आढळून आलं आहे. म्हणजेच हे लोकं परदेशातून कोरोना व्हायरस घेऊन येत आहेत असच म्हणावं लागेल. त्यामुळेच आपल्या सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे.

मंडळी नुकतेच पुण्यामध्ये कोरोनाचे ५ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर आता नायडू रुग्णालयात उपचार देखील सुरु आहेत. नुकतंच या लोकांनी दुबई दौरा केला होता. आणि येताना ते कोरोना व्हायरस देखील घेऊन आलेत. आता ते देशात आल्यानंतर ज्या व्यक्तींच्या ते संपर्कात आले होते त्यांची देखील माहिती घेऊन तपासणी केली जात आहे.

त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घ्यायला हवी कारण महाराष्ट्रात सुद्धा आता कोरोना व्हायरस दाखल झाला आहे. म्हणून आरोग्य विभागाने दिलेल्या सर्व गाईडलाईन्स फोल्लोव करा. आणि सर्वात प्रथम म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.

उदा. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो हि केवळ अफवा आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होत नाही. आणि अशा प्रकारची कोणतीही केस अजून आढळून आलेली नाही. शक्यतो सर्व प्रकारचे मांस हे शिजवून खावेत. फळे भाजीपाला चांगल्या प्रकारे धुवून घ्यावेत.

त्याचबरोबर सर्दी खोकला असलेल्या व्यक्तींपासून दुरी ठेवावी. आणि घराबाहेर पडताना N95 हे मास्क वापरा. मास्क नसला तर रुमालाने  नाक तोंड झाकणे योग्य राहील. शक्यतो गर्दीत जाण्यास टाळा. सर्वात महत्वाचं म्हणजे परदेश दौरे करून आलेल्या व्यक्तींपासून काही प्रमाणात दुरी ठेवा.

आणि तुम्ही सुद्धा काही दिवस परदेश दौरे करू नका. त्याचबरोबर तुम्हाला सर्दी खोकला, ताप अशाप्रकारची लक्षण आढळली तर लगेचचं हॉस्पिटल मध्ये जाऊन डॉक्टर ला दाखवून द्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच योग्य ते उपचार घ्या.

आपण सर्वांनी अशाप्रकारची काळजी घ्यायलाच हवी. असा अंदाज आहे कि कडक उन्हाळा लागल्यानंतर म्हणजेच जवळजवळ महिन्यानंतर हा कोरोना व्हायरस नष्ट होईल म्हणजेच कडक उन्हामध्ये या कोरोनाचे विषाणू नष्ट होतील असा अंदाज आहे. त्यामुळे तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्यावी.

तर मित्रांनो स्वतःही सुरक्षित रहा त्याचबरोबर आपल्या परिवाराची देखील काळजी घ्या. हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *