मुलीचे मोठ्या घरात लग्न लाऊन दिले, पण पुढे जे घडले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.!

मुलीचे मोठ्या घरात लग्न लाऊन दिले, पण पुढे जे घडले ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.!

मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हा संसार एक मायाजाळ आहे आणि आपली नाती-गोती ही सर्कस आहे. या मध्ये गोडवा आहे भांडण आहे तसेच रुसवा व फुगवा देखील आहे. आम्ही तुमच्यासाठी या लेखात अश्याच काही नात्यांमध्ये अडकलेल्या सरिता बद्दल सांगणार आहोत आणि या सरिताची कहाणी ऐकून तुमच्या ही अंगावर काटा येईल. चला तर आढावा घेऊया कोण आहे ही सरिता व कसा नशीबाने तिच्या आयुष्याचा खेळ मांडला.

मित्रांनो नशिबापुढे कधी कोणाचे काही चालत नाही जे विधी-लिखीत आहे तेच घडते. सरिता एक चांगल्या घरातील सोज्वळ मुलगी होती. सरिताचा स्वभाव अगदी मन-मिळावू सगळ्यांनाच आवडेल असा घर कामाची सुद्धा तिला भारी आवड होती. जेवण म्हणाल तर स्वतः अन्नापूर्णा माता सरिताच्या हातात वास करत होती. सरिता घरात मोठी मुलगी व सर्वांचीच लाडकी होती.

सरिताने बारावी पर्यंत शिक्षण घेतले होते सोबतच तिने शिवण क्लासचे ही प्रशिक्षण घेतले होते. सरिताची घरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती आई-वडिल दोघे ही शेतकरी होते आणि पाच एकर एवढी त्यांची शेती होती. ते आपले व आपल्या कुटुंबाचे पोट या शेतीवरच भरत होते. एकदा एक मोठ्या घरातले स्थळ सरितासाठी समोरुन मागणी घालण्यासाठी आले.

मुलग्याचे नाव विक्रम होते. मुलगा चांगला शिकलेला उच्च पदावर नोकरी दिसायला देखणा रुबाबदार श्रीमंत. सरिताचे आई-वडिल खूप आनंदी झाले सगळी बोलणी झाली व महिन्याभराने सरिता व विक्रम यांचा विवाह लावून देण्याचे ठरले. विक्रमच्या आई वडिलांनी सरिताच्या वडिलांकडे एक लाख रुपये हुंड्याची मागणी केली. स्थळ चांगले होते आपली मुलगी आयुष्यभर आनंदी राहिल हा विचार करुन सरिताचा वडिलांनी आपली सर्व शेत जमीन गहाण ठेवून त्यांच्या लाडक्या लेकीच्या लग्नासाठी पैसे उभे केले.

बघता बघता लग्न झाले व काही दिवसांनी सरिताच्या सासरच्या माणसांचा स्वभाव बदलला सरिताचा नवरा जो रुबाबदार होतो तोच रोज दारु पिवून घरी येवू लागला आणि जर त्याला सरिताने काही विचारले तर तो तिला मारहाण करत असे. सासरे देखील तसेच रोज सकाळ संध्याकाळ फक्त दारु आणि तोंडामध्ये शिव्या. प्रेमळ वागणारी सासू आता राक्षसीण झाली होती ती प्रत्येक गोष्टीत सरिताला ओरडत असे घराच्या बाहेर पाय ठेवायचा नाही कोणत्या ही पुरुषाशी बोलायचे नाही अगदी घरातल्या नोकर माणसासोबत ही नाही. गोड वाटणारी ननंद आता प्रत्येक गोष्टीत सरिताशी वाद घालत असे तिला टोचून बोलत असे. असे हे चालतच राहिले व अखेर लग्नाला अनेक वर्षे पूर्ण झाली सरिताच्या पदरात एक मुलगा व एक मुलगी पडले होते.

मुलगा व मुलगी आता जाणकार झाले होते. सरिताचा मुलगा मात्र विक्रमच्या वळणावर गेला होता. तो सतत तिच्याकडे पैशाची मागणी करत असे नही दिल्यास जीवाचं काही बरे वाईट करुन घेईन अशी धमकी देत असे. सासू-सासरे दोघे ही दोन वर्षापूर्वी हृदयाच्या त्रासातच वारले होते. सरिताची मुलगी अगदी सरितावर गेली होती. ती सरिताची काळजी घेत असे घर सांभाळण्यास सरिताला हात भार लावत असे.

एकदा सरिताच्या मुलाने सरिताकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली सरिताने ते देण्यास नकार दिला आणि तिच्या मुलाने खरचं स्वत:ला पैट्रोलने पेटवून घेतले व त्यातच तो मरण पावला. शिवाय सरिताचा नवरा हे सगळ फक्त एका जागेवर झोपून फक्त बघू शकत होता कारण अति दारु मुळे त्याच्या दोम्ही किडन्या बाद झाल्या होतो व तो डायलासिस व जगत होता. असे हे सरिताचे जीवन सगळे गुण असून सुद्धा तिच्या नशिबात नेहमी दु:खाचेच डोंगर येत राहिले आणि ती बिचारी हाताश होवून फक्त सहन करत राहिली.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *