बायकोने आईवर चोरीचा आरोप केल्यावर मुलाने काय केले हे एकदा आवश्य पहा.

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बायको सतत आईवर आरोप करत होती आणि नवरा सतत तिला आपल्या मर्यादेत राहण्यास सांगत होता. तरीही बायको गप्प बसायचं नावच घेत नव्हती. ती जोरजोरात ओरडून सांगत होती कि मी अंगठी टेबल वरच ठेवली होती आणि तुमच्या आईशिवाय खोलीत कोणीच आलेलं नव्हतं. अंगठी असो वा नसो ती आईनेच उचलली आहे.

गोष्ट जेव्हा पतीच्या सहनशक्तीच्या बाहेर गेली तेव्हा त्याने बायकोच्या जोरदार कानाखाली लावून दिली. ३ महिन्यापूर्वीच लग्न झालेलं होत. पत्नीला ती चापट सहन झाली नाही आणि ती घर सोडून चालली आणि जाताजाता पाटील एक प्रश्न विचारला कि तुम्हाला तुमच्या आईवर इतका विश्वास का..? तेव्हा पतीने उत्तर दिले आणि ते ऐकून दरवाजा मागे असलेल्या आईचे मन भरून आले.

पतीने पत्नीला सांगितलं जेव्हा मी छोटा होतो तेव्हा वडील वारले. आई आजूबाजूच्या परिसरात झाडू मारून थोडे पैसे आणायची ज्यात १ वेळचं पोट भरायचं. आई एका ताटात भाकर वाढायची आणि रिकामी डब्याला झाकून ठेवायची आणि म्हणायची माझी भाकरी या डब्यात आहे बाळा तू खा.

मी पण नेहमी अर्धी भाकर खाऊन म्हणायचो कि आई माझं पोट भरलंय आता मला नाही खायचं. आईने माझी उष्टी भाकरी खाऊन माझं पालन पोषण केलं आणि मला मोठं केलं. आज मी २ भाकरी कमवायचा लायकीचा झालो पण मी हे कसं विसरू कि आईने त्यावेळेस तिच्या भुकेला मारलं. ती आई या स्थितीला एका अंगठीसाठी भुकेली असेल हा मी विचार सुद्धा करू शकत नाही. तू तर ३ महिन्यापासून माझ्या सोबत आहेस पण मी तर आईच्या तपश्चर्या ला २५ वर्ष बघितलंय.

हे ऐकून आईच्या डोळ्यात अश्रू आले. ती समजू शकत नव्हती कि मुलगा अर्ध्या भाकरीचं कर्ज फेडतोय कि ती मुलाच्या अर्ध्या भाकरीचं कर्ज. तर मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *