Usb Condom नक्की काय आहे.? आणि हे नक्की काम कसे करते. ?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपलं स्वागत आहे. मित्रांनो आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या आयुश्यातला एक महत्वाचा भाग बनला आहे. उठता-बसता, चालत-फिरता मोबाइल कायम आपल्या सोबत असतो. पण कधी आपल्या कडे मोबाईल नसेल किंवा त्याची बॅटरी संपते तेव्हा आपलं सर्व काम थांबून जातं. आजच्या काळात आपण स्वतःपेक्षा आपल्या मोबाईल च्या बॅटरी ची काळजी जास्त घ्यायला लागलो आहोत. मोबाईल द्वारे आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी गप्पा करू शकतो तसेच ऑनलाईन वस्तू विकत घेऊ शकतो. तसेच अजूनही काही महत्वाची काम करू शकतो. पण अशावेळी आपल्या मोबाईल ची बॅटरी संपते तेव्हा आपल्याला खूप अडचणींना सामोरे जावं लागतं. म्हणून एअरपोर्ट, शॉपिंग मॉल्स, वगैरे इत्यादी ठिकाणी चार्जिंग चे पॉईंट दिलेले असतात. आपण या पॉईंट ला आपला मोबाइल कनेक्ट करतो आणि चार्जिंग करू लागतो. पण तुम्हाला माहिती आहे का अशा पोर्ट द्वारे मोबाईल चार्जिंग करणं सुरक्षित नसते.
मित्रांनो पब्लिक प्लेस वर या डेटा पोर्ट चा वापर हॅकर्स आपला डेटा चोरण्यासाठी करतात. यांच्याशी वाचण्यासाठी मार्केटमध्ये डेटा ब्लॉकर आले आहेत आणि त्यांना Usb Condom नाव देण्यात आले आहे. हे कंडोम सध्या कंडोम सारखे नसतात परंतु हे आपला देता प्रोटेक्ट करू शकतात. आणि हे आपल्याला Juice Checking पासून वाचवतात. Juice Checking एक प्रकारचं सायबर अटॅक असतो आणि या मध्ये पब्लिक चार्जिंग पोर्ट द्वारे आपल्या मोबाईल मध्ये Malware इन्स्टॉल केला जातो जे आपला पर्सनल देता हॅकर्स पर्यंत पोहोचवतो.
zdnet.com
Usb Condom छोट्या Usb अडॅप्टर सारखे असतात. यामध्ये इनपुट आणि आउटपुट पोर्ट असते. हा जो अडॅप्टर असतो तो आपल्या मोबाइल मध्ये पॉवर सप्लाय तर करतोच पण डेटा ट्रान्सफर आणि डेटा एक्सचेंज पूर्णपणे थांबवते. आणि हे इतकं छोटा असते कि आपण याला कुठेही घेऊन जाऊ शकतो. आणि यांच्या किमतींबद्दल बोललं तर भारतात हे ५००-१००० रुपयांमध्ये ऑनलाईन भेटते. मित्रांनो हॅकर्स आपल्या मोबाईल मध्ये Malware इन्स्टॉल करतात तेव्हा ते तुमच्या मोबाईल ला ब्लॉक करू शकतात. तसेच ते आपली संवेदनशील गोष्टी हि चोरी करू शकतात ज्याने आपले खूप नुकसान होऊ शकते. सायबर सेक्युरिटी नुसार Malware Computing पॉवर ला हायजॅक करू शकतात ज्याने आपला मोबाईल स्लो होऊ शकतो आणि तुमचा डेटा सुद्धा या हॅकर्स कडे जाऊ शकतो. मित्रांनो तुम्ही जर का पब्लिक प्लेस मधील पोर्टमधून मोबाईल चार्जे करत असाल तर आपल्याला Usb Condom चा उपयोग नक्कीच केला पाहिजे.
मित्रांनो तुम्हाला आता पूर्णपणे कळले असेलच कि नक्की हे Usb Condom काय असते. आम्ही आशा करतो तुम्हाला हि माहिती नक्कीच आवडली असेल. आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रणींना शेअर जरूर करा.