विमानाला पांढरा रंगच का दिला जातो ? याच्यामागचं खरं कारण तुम्हाला माहिती आहे का?

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi मध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि विमानाचा रंग हा पांढराच का असतो. आणि हा पांढरा रंग का दिला जातो हे जाणून घ्यायचं असेल तर हि माहिती पूर्ण वाचा.

बरेच लोक विमानाने प्रवास करतात. आपण हा कधी विचार केला आहे का कि ज्या विमानामध्ये आपण बसलेलो आहोत त्याचा रंग पांढराच का आहे. विमानाला पांढराच रंग असतो असे काही नाही परंतु जास्तीत जास्त विमानांना पांढरा रंग असतो. जी कलरफुल विमान आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे. अधिकाधिक विमानांचा रंग हा आपल्याला पांढराच दिसून येतो. यामागची काही कारणं आहेत तीच आपण जाणून घेउयात.

wonderfulengineering.com

विमानाला थंड ठेवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा वापर केला जातो. आणि त्यामुळेच विमानाला इतर रंगांपेक्षा हा रंग लावल्यास कमी उकडते म्हणजेच आपल्याला त्या विमानातील जे तापमान आहे ते कमी करता येतो. जर आपण बघितलं तर जवळपास ३ लाखांपासून ते १ कोटींपर्यंत खर्च एका विमानाला रंग लावण्यासाठी येतो. आणि कोणतीही कंपनी एका विमानाला एवढा रंग लावण्यासाठी खर्च करणार नाही. त्याचबरोबर रंग लावण्यासाठी ३ ते ४ आठवडे इतका कालावधीही एका विमानाला रंग लावण्यासाठी लागतो. त्यामुळे कंपनीचे खूप नुकसान हि होऊ शकते. आणि त्यावर उपाय म्हणून तिथे पांढरा रंग दिला जातो. दररोज विमानं उन्हामध्ये उभी असल्यास त्यांच्यावर लावलेला रंग हा फिकट होऊ शकतो मात्र पांढऱ्या रंगासोबत अशी समस्या होत नाही म्हणून जास्तीत जास्त जी विमान आणि विमान कंपन्या आहेत त्या विमानाला पांढरा रंगच देतात.

youtube.com 

जास्तीत जास्त विमानांना पांढरा देण्याचं एकमेव कारण म्हणजे कंपनी विमान खरेदी करते आणि विकत असते. अशावेळी जर पांढरा रंग असेल तर कंपनीचे नाव लवकर बदलता येते. कोणताही दुसरा रंग लावल्यास विमानाचे वजन वाढते. त्यामुळे पेट्रोल जास्त लागू शकते. पांढऱ्या रंगामुळे पेट्रोल कमी लागते. आणि त्यामुळे कंपनीला विमान उडवणे परवडते.

तर मित्रांनो तुम्हाला समजलंच असेल कि या सर्व कारणांमुळेच विमानाचा जो रंग आहे तो पांढरा असतो. हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *