पहा कोण कोणते चित्रपट 2020 मध्ये रिलीज होणार आहेत। Upcoming Marathi Movies

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो २०१९ मध्ये अनेक चित्रपट येऊन गेले आणि चित्रपटांनी मराठी सिनेसृष्टीला अधिक उन्नत बनवलं. पण आता २०१९ वर्ष जातंय आणि २०२० वर्ष आपल्या समोर येतंय. आणि या २०२० मध्ये कोणकोणते चित्रपट आपल्या भेटीस येणार आहेत हेच आपण आज पाहणार आहोत.

१. Makeup

youtube.com
हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० मध्ये रिलीज होणार आहे. मेकअप या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे रिंकू राजगुरू म्हणजेच सर्वांची लाडकी आर्ची. आणि या चित्रपटामध्ये रिंकूचा एक वेगळाच लुक आपल्याला पाहायला मिळणार आहे. 
२. Dhurala

loksatta.com
हा चित्रपट ३ जानेवारी २०२० मध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटामध्ये मोठे मोठे कलाकार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या मध्ये साई ताम्हणकर, प्रसाद ओक, अलका कुबल सुद्धा आहे. असा मोठा स्टारकास्ट असलेला हा चित्रपट कसा असणार आहे हे आपल्याला ३ जानेवारी नंतरच कळणार आहे. 


३. Jungjohar

loksatta.com
Fatteshikast आणि Farzand या चित्रपटांच्या यशांतर Jungjohar हा चित्रपट २०२० ला येणार आहे. Digpal Lanjekar हा चित्रपट घेऊन येणार आहे. बघूया हा चित्रपट प्रेक्षकांना पसंद पडतो का.

४. Talli cinestaan.com

नुकताच टकाटक चित्रपट येऊन गेला असा आपला टकाटक हिरो म्हणजे प्रथमेश परबचा  २०२० ला येणार आहे टल्ली हा चित्रपट. नावावरून हा चित्रपट तरुणांचा आणि विनोदी चित्रपट आहे असं आपल्याला दिसून येतंय. बघूया टल्ली हा चित्रपट प्रेक्षकांना किती टल्ली करायला लावतोय. 


५. Tattad 


marathistars.com

२१ फेब्रुवारी २०२० ला तत्ताड हा चित्रपट येणार आहे. या पोस्टर वरून तर असं पाहायला मिळतंय हा चित्रपट संगीत कलाकार यांच्या जीवनावर आधारित आहे. तर Tattad हा वेगळं नाव असलेला चित्रपट कितपत पसंतीस पडतो हे २१ फेब्रुवारी नंतर आपल्याला कळेल. 


६. Tanhaji 


scroll.in

सर्वांचे डोळे एका चित्रपटाकडे लागून राहिलेत तो म्हणजे Tanhaji (The Unsung Warrior ) या चित्रपटाकडे. हिंदी बरोबरचं मराठी मध्ये सुद्धा हा चित्रपट आपल्याला बघायला मिळणार आहे. १० जानेवारीला हा चित्रपटगृहामध्ये लागणार आहे. 


७. Jhimma 


marathistars.com

हेमंत ढोमे दिग्दर्शित झिम्मा हा चित्रपट २०२० मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.  Jhimma हा एक महिलांचा खेळण्याचा प्रकार आहे आणि हाच चित्रपटाचा विषय सुद्धा आहे. बघुयात झिम्मा हा चित्रपट कितपत लोकांना आवडतो.

८. Gosht Eka Paithanichi


youtube.com

या चित्रपटामध्ये सायली संजीव हिने मुख्य भूमिका केली आहे. तर हि गोष्ट सर्वांना आवडते का हेच पाहायचं आहे. 


९. Paavan Khind

marathi.peepingmoon.com


अभिजित देशपांडे दिग्दर्शित पावनखिंड हा चित्रपट २०२० ला आपल्याला पाहायला मिळणार आहे. Pavan Khind हा प्रसंग तर आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेलाच आहे. इतिहासातील एक सुर्वणपाण Paavankhind या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. 


१०. De Dhakka २


in.bookmyshow.com

काही वर्षांपूर्वी आलेला दे धक्का हा चित्रपट सर्वांनाच आवडला. पण २०२० मध्ये De Dhakka चा दुसरा पार्ट देखील येणार आहे. आणि याचं पोस्टर काहीच दिवसांपूर्वीच लाँच करण्यात आलं होत. हा पुन्हा एकदा धक्का प्रेक्षकांना कसा बसणार आहे हे पाहायचं आहे. 


११. Choricha Mamla 


marathistars.com

जितेंद्र जोशी यांचा चोरीचा मामला हा चित्रपट सुद्धा २०२० मध्ये येणार आहे. हा विनोदी चित्रपट असणार आहे. विनोदाचा नवरा कोरा हमला घेऊन येतो आहे  Choricha Mamla.

१२. Ahilya 


timesofindia.indiatimes.com

खूप मोठी लिस्ट या चित्रपटांमध्ये आहे त्यामध्येच महिलांसाठी प्रेरणादायक असलेला  अहिल्या हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार आहे. 
अशा प्रकारचे सुंदर चित्रपट २०२० मध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही यामधील कोणता चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहात हे कॉमेंट मध्ये कळवा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *