दुबईमध्ये एवढा पैसा येतो कुठून.? विचार करुण डोक्यात आग लागेल..!

जगातील सर्वष्रेष्ठ देश कोणता? प्रत्येकाचे विचार वेगळे असतील, कोणी म्हणेल अमेरिका तर कोणी म्हणेल दुसरे राष्ट्र. पण जगात टॉप देशांपैकी एक सर्वात फास्ट प्रगती करणारा देश आहे दुबई.

दुबई एवढा सर्वात श्रीमंत का आहे? जास्तीत जास्त लोकांना वाटत असेल दुबईत तेलाचा व्यापार जास्त होतो. दुबई फक्त तेल विकून मोठा होत आहे. तर तसं नाही आहे, दुबई तेल विकून फक्त १% पैसे कमवतो. दुबईच्या इनकम मधून फक्त १% रक्कम तेलांमधून येते. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेल. जगातील सर्वात उंच इमारत Burj Khalifa दुबईमध्ये आहे.

जगातील सर्वात मोठा मॉल Dubai Mall दुबईमध्येच आहे. जगातील सर्वात मोठा मॅनमेड आयलंड Palm Jumeirah  दुबई मधेच आहे.  जगातील सर्वात मोठं सेव्हन स्टार हॉटेल Burj Al Arab दुबई मधेच आहे. जगातील सर्वात मोठा फुलांचा बगीचा Dubai Miracle Garden दुबई मधेच आहे. जगातील सर्वात मोठं फाईव्ह स्टार हॉटेल JW Marriott दुबई मधेच आहे. जगातील सर्वात मोठे सोन्याचे मार्केट Gold Souk दुबई मधेच आहे. शेकडो रेकॉर्डस् दुबईच्याच नावावर आहेत.

दुबई एका वाळवंटापासून स्वर्ग बनलेली सिटी आहे. आपण यासाठी सर्व मुद्दे पाहू जेणेकरून आपणास कळेल कि दुबई चा विकास कसा झाला.

१. Tax Free City 

startuptalks.in

कोणत्याही देशामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे टॅक्स. सरकार कडून उकळला जाणारा पैसा.  उदा. भारत सरकार काय करते. जर तुम्ही नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल त्यामधून तुम्ही जे काही उत्पन्न मिळवता, जो काही पैसे मिळवता त्या वर टॅक्स लावला जातो. तुमच्या उत्पन्नाचा काही भाग सरकार काढून घेते. देशातील प्रत्येक वस्तूवर टॅक्स भरावा लागतो.

सरकार पूर्ण नागरिकांच्या जीवावर चालते. परंतु दुबई सरकार नागरिकांकडून कोणताही टॅक्स घेत नाही.तुमचा सर्व इनकम टॅक्स फ्री असतो. येथील सरकार तुम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये सकारात्मक मदत करते. नवनवीन बिसिनेस सुरु करण्यास मदत करते. सुरु असलेले स्टार्टअप आणि सुरु असलेले स्टार्टअप वाढवण्यासाठी अजून प्रोत्साहन करते. यासाठी जगातील सर्व क्षेत्रांमधून लोक दुबईमध्ये गुंतवणूक करत आहेत.

२. Business In Dubai. 

vz.ae

जगातील सर्व उद्योगपतींना नवनवीन फॅसिलिटी देऊन अनुकूल वातावरण बनवून दुबई सरकार सर्व उद्योगपतींना दुबईकडे आकर्षित करत आहेत. दुबई मध्ये असलेली एअरलाईन जी जगातील सर्वात मोठ्या एअरलाईन पैकी एक आहे. दुबई मधून खूप चांगल्या प्रकारे  सर्वत्र कनेक्टिव्हिटी आहे. सागरी मार्गाने सर्व देशांना अगदी सहजपणे कनेक्ट करता येत. जगभरातील मोठमोठे उद्योगपती दुबईमध्ये गुंतवणूक करत आहेत. सोबतच दुबई मध्ये गुंतवणूक किंवा जमीन खरेदी करणे खूप मोठ्या प्रतिष्टेचे मानले जात आहे.

३. Law And Order 

express.co.uk

दुबई सिटी कायदा व्यवस्थेसाठी खूप प्रसिद्ध आहे. कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करणे किंवा गुन्हा करणे खूप मोठा अपराध मानला जातो. प्रत्येक गुन्हेगाराला सर्वात कठीण शिक्षा दिली जाते. दुबई मध्ये खूप कमी गुन्हे होतात. ज्यामुळे दुबईत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटायला लागतं. गुन्हेगारी नसल्यामुळे बाहेरून गुंतवणूक करणे किंवा बिसिनेस करणे खूप सुरक्षेचे वाटायला लागते.

दुबई सध्या New York, Tokyo, London या सारख्या देशांना टक्कर देत आहे. या मोठ्या सिटींपेक्षा दुबई जरी कमी असेल तरीसुद्धा दुबई जास्त फेमस आहे. याचे कारण म्हणजे मार्केटिंग दुबई च्या PR एजन्सी खूप मोठ्या प्रमाणात मार्केटिंग करत आहेत. कोणत्याही देशाची प्रगती फक्त ५ गोष्टींवर अवलंबून असते.

  1. Startup Ecosystem
  2. Employee Sallary
  3. Social Security
  4. Cost Of Living
  5. Quality Of Life

हे मुद्दे खूप महत्वाचे ठरतात. त्यामुळे दुबई यासाठीच बेस्ट आहे. दुबई सरकार तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल जेव्हा तुम्ही तिथे बिसिनेस कराल. म्हणून दुबईला इन्व्हेंशन हब म्हणून ओळखले जाते.

जर हि माहिती तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *