Valentines Day म्हणजे नक्की काय? | जाणून घ्या Valentines Day साजरा करण्यामागचं खरं कारण.!

नमस्कार DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो Valentines Day हा असा एकमेव दिवस आहे जो संपूर्ण जगभरात एका व्यक्तीच्या मरणार्थ साजरा केला जातो. तिसऱ्या शतकातील यूरोप मधील रोम पूर्ण जगभरात शक्तिशाली साम्राज्य म्हणून मानले जात होते. रोम चा राजा होता कोल्डिअस. तो स्वभावाने निर्दयी व क्रूर होता. कोल्डिअस च्या मते लग्न न झालेला पुरुष लग्न झालेल्या पुरुषापेक्षा ताकदवान असतो. याचकारणाने कोल्डिअस ने त्याच्या राज्यत लग्न करण्यावर बंदी आणली. त्याच्या या निर्णयामुळे लोकांच्यात खूप असंतोष पसरला.

uncutmountainsupply.com

त्याच काळात रोम मध्ये एक फादरी राहत होते. त्यांचे नाव होते Saint Valentine. ते या आदेशाच्या पूर्णपणे विरोधात होते. त्यांनी राजाच्या नकळत लग्न लावायचे ठरवले. पण काही काळाने राजाला हि गोष्ट कळली, आणि राजाने त्यांना फाशी देण्याचे ठरवले.

wonderideas.club

मित्रांनो हा दिवस होता १४ फेब्रुवारी. याच दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. फाशी देण्याआधी Saint Valentine नि एक लेटर लिहिले होते. त्या लेटर च्या शेवटला त्यांनी Yours Valentines असा केला होता. मित्रांनो अशाप्रकारे Saint Valentine यांनी संपूर्ण जगाला प्रेमाचा संदेश दिला होता.

म्हणूनच  आपण आज Valentines Day च्या निगडित काही आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेणार आहोत.

  • मित्रांनो दरवर्षी १४ फेब्रुवारी ला Valentines Day  हा दिवस जगभर साजरा केला जातो. फ्रान्स,कॅनडा,मेक्सिको,इटली,डेन्मार्क,ऑस्ट्रेलिया, यांसारख्या देशामध्ये Valentines Day हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. १९९२ पासून Valentines Day हा भारतात देखील साजरा होऊ लागला. 
  • मित्रांनो एकट्या अमेरिकेत १८ करोड गुलाबांची विक्री हि Valentines Day च्या दिवशी होते. 
  • इटली मध्ये अशी परंपरा आहे कि Valentines Day दिवशी दिसणारा पहिला पुरुष हा होणार जीवांसाठी आहे असे मानले जाते. 
  • संपूर्ण जगात जपान हा असा एकमेव देश आहे जिथे फक्त पुरुष Valentines Day साजरा करतात. 
  • मित्रांनो दरवर्षी १४ फेब्रुवारीला एक अरब ग्रीटिंग कार्ड  जगभरात पाठवली जातात. 
  • मित्रांनो संपूर्ण जगभरात इराण हा असा देश आहे जिथे Valentines Day हा बॅन आहे. इराण सरकारने २०११ पासून Valentines Day बॅन केला आहे. इकडे या दिवशी लाल गुलाब आणि प्रेमाची प्रत्येक गोष्ट बॅन आहे. 
  • जगातील पहिले valentine card हे १८व्या शतकात पाठवण्यात आले होते. 
  • २०१० मध्ये Valentines Day दिवशी मेक्सिको मध्ये  ३९,८९७ लोकांनी एकसाथ किस करण्याचा विश्व विक्रम केला होता. 
  • १४ फेब्रुवारी हा जरी प्रेमिकांच्या दिवस असला तरी जगभरात जास्त ग्रीटिंग कार्ड्स हि शक्षकांना दिली जातात. 
  • जर्मनी मध्ये मुली Valentines Day दिवशी कांद्याचे झाड लावतात व त्याभोवती मुलांच्या नावाच्या चिट्ठ्या पसरवतात. त्यांचा असा समज आहे कि ज्या चिट्ठीच्या शेजारी पहिले रोपटे येईल त्या व्यक्तीशी त्यांचं लग्न होईल. 

मित्रांनो या होत्या Valentines Day बद्दलच्या काही विलक्षण गोष्टी. जर तुम्हाला हि माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *