केस न गळण्याकरिता करा हे घरगुती उपाय | How to Reduce Hairfall.?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत कि केस गळण्याची समस्या जर तुम्हाला असेल तर अशा ५ गोष्टी कोणत्या करायच्या ज्याने तुमची केस गळती थांबेल. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये केसांचं पोषण आमचं राहून जाते आणि केसांचं पोषण होणं खूप गरजेचे आहे. पोषण न झाल्यास केस मोठ्या प्रमाणावर गळतात त्यामुळे केसांची काळजी घेणं खूप गरजेचे आहे. केस धुण्याच्या आधीही त्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे.
केस धुण्याआधी आपण काय करावं? कोणत्या टिप्स फायदेशीर ठरतील हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बदाम,ऑलिव्ह किंवा एरंडतेल या प्रकारच्या तेलांना एकत्रित करून घ्यावे. आणि ते मिश्रण केलेलं तेल केसांना लावावे. त्यामुळे केसांना योग्य पोषण मिळेल आणि केस गळणे थांबेल.
केस धुण्यासाठी खूप गरम पाणी वापरूच नये. गरम पाणी वापरल्यामुळे तुमचे जे केस आहेत ते तुटतात. कारण गरम पाण्यामुळे केसांना इजा पोहोचतात तसेच गरम पाण्यामुळे तुमचे केस कडक आणि कोरडे सुद्धा होतात.
अंघोळीआधी केसांना दही आणि अंड यांचे मिश्रण लावावे. हे मिश्रण कंडिशनर म्हणून काम करते. हे सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कंडिशनर म्हणून मानले जाते. तसेच केस धुण्याआधी केसांना तेल लावून २० मिनिटे मालिश करावी.
काळी डाळ रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी ती व्यवस्थित वाटून घ्या आणि त्या मध्ये अंड , लिंबाचा रस आणि दही टाकून ती केसांना लावल्याने फायदा होतो.
तर मित्रांनो अशाप्रकारे आपले जर केस गळत असतील तर या ज्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगितल्या आहेत त्या केसांसाठी सर्वोत्कृष्ट आहेत, त्यामुळे आपले केस गळत आहेत ते नक्कीच थांबतील. हि माहिती आपल्याला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा.
टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.