श्रीमंत असलेल्या बापाला मुलगा चुना लावून गेला जपानला; त्यानंतर बापाचे झालेले हाल पाहून तुम्हालासुद्धा रडू येईल.!
मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अनेकदा आपल्या जीवनामध्ये काही संकटे आली तर आपण त्यांचा उगाच बाऊ करत असतो परंतु आपल्या आजूबाजूला असे सुद्धा काही माणसे आहेत ते त्यांच्या वागणुकीने मधून आपल्यासाठी एक प्रेरणास्त्रोत बनून जातात अशाच एका व्यक्तीची कहाणी आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत. ही कहाणी व ही माहिती वाचल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
मंदिराच्या बाहेर भिक्षेकरी यांना तपासत होतो. नेहमीप्रमाणे रुग्ण म्हणून भिक्षेकरी यांना मी चेक करत होतो. हे रुग्ण म्हणजे मंदिराच्या बाहेर बसणारी भिकारी होते पण अचानक माझी नजर एका कोपऱ्याकडे गेली आणि तिथे एक बाबा बसलेले होते. बाबा दिसायला अतिशय तेजस्वी होते. त्यांचा चेहरा काहीतरी सांगत होता. चेहर्यावर एक वेगळेच तेज होते. पाठीचा कणा एकदम ताठ.
अंगार स्वच्छ कपडे साधी राहणीमान आणि मग बराच वेळ मी त्यांच्याकडे बघत होतो. परंतु ते भिक्षेकरी नव्हते नंतर मग लक्षात आले की त्यांना उजव्या गुडघ्याच्या घोट्यापासून पायच नव्हता आणि कुबड्या बाजूला ठेवलेल्या होत्या. त्यांच्यावर सहज लक्ष गेले कोणी तरी त्यांना काहीतरी देत होते आणि ते घेत होते. मी त्यांच्याकडे पाहत होतो मी त्यांच्याकडे जाणार तेवढ्यात एक जण मला म्हणाला डॉक्टर त्यांच्या कडे जाऊ नका.
तो विक्षिप्त माणूस वेडा आहे परंतु माझी उत्सुकता काही थांबत नव्हती मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे हात पुढे केला, मला आशा होती की ते माझ्या हाताला हात मिळवतील परंतु त्यानी हात पुढे केला नाही.. मी त्यांना मी विचारलं बाबा काही त्रास आहे का? तेव्हा ते कुबड्या घेऊन उभे राहिले आणि मला म्हणाले आय हॅव आय प्रॉब्लेम. इन माय राईट आईज देअर आर पेनिंग. इतके असखल्लित इंग्रजी एकूण मी शॉक झालो. मी त्यांचा डोळा पाहिला तेव्हा डोळे अतिशय पिकलेले होते नजर जर झाली होती ,त्या डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झालेला होता आणि मी बाबांना म्हटलं की बाबा तुमच्या डोळ्यात मोतीबिंदू झालेला आहे तेव्हा म्हणाला हो माय गॉड.
कॅटराक, आय हॅव डन माय ट्रीटमेंट इन 1999.मला हा प्रकार काही कळत नव्हता. तेव्हा मी त्यांना म्हणालो बाबा, आठवड्यातून दोन दिवस मी येथे येतो परंतु तुम्ही मला अनेक दिवसापासून दिसता.. नेमकं काय प्रकरण आहे मला तर तुम्ही भिक्षेकरी वाटत नाही आहात. तुम्ही मला चांगले शिकलेले दिसत आहेत हे एकूण ते जोरात हसू लागले तेव्हा मी त्यांना विचारले काय झाले बाबा? तुम्ही का हसत आहेत.
मी काही चुकीचे बोललो का तेव्हा ते म्हणाले नाही ..नाही.. सॉरी, मी तुम्हाला दुखावले असेल तर. बाबा म्हणाले तुम्ही जाणून काय करणार आहात तेव्हा डॉक्टर म्हणाले सांगा तसही तेव्हा बाबा म्हणाले चला आपण कोपऱ्यामध्ये बसू नाहीतर लोक सुद्धा तुम्हाला माझ्यासारखे वेडे म्हणू लागतील. आम्ही दोघे बाजूला जाऊन एका चहाच्या टपरी जवळ बसलो तेव्हा बाबांनी संवादाला सुरुवात केली ,वेल आय एम मेकानिकल इंजिनिअर असे इंग्लिश मध्ये म्हणून त्यांनी सुरुवात केली. या कंपनीमध्ये सीनियर पोस्ट म्हणून कामाला होतो.
माझ्या ज्युनियर ला काम शिकवताना माझा पाय मशीनमध्ये सापडला आणि मी कायमस्वरूपी लंगडा झालो तेव्हा कंपनीने सगळे खर्च केला आणि थोडी फार जास्त किंमत देऊन मला घरी बसवले. या लंगड्या बैलाला कोण विचारणार त्यानंतर मी मेहनत करून एक वर्कशॉप टाकले आणि माझ्या कुटुंबाचे संगोपन केले.माझ्या मोठ्या मुलाला सुद्धा शिकवून मेकॅनिकल इंजिनिअर केले तो सुद्धा कामांमध्ये हुशार होता त्यानंतर त्याने आपल्या व्यवसाय वाढवण्यासाठी घर व कंपनी आपल्या नावावर करून घेतली आणि नंतर ती विकून टाकली.
मी सुद्धा त्याला थांबवले नाही कारण की त्याचा व्यवसाय तेजीने व्हावा हीच माझी इच्छा होती परंतु तो नंतर जपानला गेला आणि आम्ही जपानी गुडिया म्हणजेच बाहुलीसारखे येथे खेळत बसलो. हे बाबा हसत म्हणाले एखाद्या व्यक्तीस हसणे इतके करुण असेल याची जाणीव मला पहिल्यांदा झाली. मी त्यांना विचारले बाबा एवढे शिकलेले आहात तुम्ही सहजरित्या कुठेही काम करू शकता.
तुमच्याकडे खूप सारा अनुभव आहे. तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये सुद्धा काम करु शकतात ते म्हणाले पाच वाजेपर्यंत एका कंपनीमध्ये काम करतो आणि त्यानंतर पाच ते सात येथे बसतो. इथे मला लोक काय खायला देतात पण खायला दिलेले मी स्वीकारत नाही परंतु तुम्ही काही पैसे दिले तर मी स्वीकारतो यानंतर बाबा म्हणाले की माझ्या घरी माझी बायको आहे तिला लखवाचा त्रास आहे आणि मला जी नोकरी आहे त्यामधील चांगला पगार सुद्धा आहे त्यात सात हजार रुपये पगार असून मी खुश आहे त्यानंतर म्हणाले की मी घरी गेल्यानंतर आमच्या तिघांचे स्वयंपाक बनवतो आता डॉक्टर ला कळत नव्हते की मग बाबा दोघच म्हणाले आता तीसरे कोण?
अशावेळी जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या मित्राच्या आईने माझे सर्व केले परंतु काही दिवसांपूर्वी माझ्या मित्राचे नि’ध’न झाले आणि त्याची ९२ वर्षाची आई पोरकी झाली. माझ्यावर केलेल्या सर्व कार्याची जाणीव ठेवून मी तिला माझ्या घरी घेऊन आलो. आईला डायबीटीस आणि ब्लड प्रेशर आहे तिच्या औषधाचा खर्च भागवण्यासाठी मी इथे पाच ते सात बसत आहे. मी एका ओळखीच्या मेडिकल स्टोअरमधून तिच्या महिन्याभराच्या औषध मी घेतो आणि इथे पाच ते सात वाजेपर्यंत बसून जे पैसे मला मिळतात ते सारे पैसे मी मेडिकल वाल्याला देऊन येतो.
आता मात्र मला बाबांचा अभिमान वाटत होता. स्वतः दि”व्यां”ग असताना दुसऱ्याचा विचार करत आहे आपल्या मुलाचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याच्या आईला आपला जीव लावत होते त्यानंतर बाबा मला म्हणाले किती दुसऱ्याची आई नाही,माझी आई आहे कारण की आईने माझ्यासाठी खुप केलेला आहे आता माझे कर्तव्य आहे. परंतु तुम्ही फक्त औषधांसाठी इथे बसत आहात हे तुमच्या घरच्यांना कळाले तर बाबा म्हणाले कसे कळणार ते दोघही खाटेवरून उतरू शकत नाही.
या कुशीवरून त्या कुशीवर सुद्धा जाऊ शकत नाही तर त्यांना कसे कळणार मी घरी गेले तर त्यांचे सगळे करतो. जर मी तुम्हाला चालत असेल तर सांगू का ?डॉक्टर तुम्ही खूप चांगले कार्य करत आहात असेच कार्य करत राहा परंतु बाबा मला वाटते की तुमचा मुलगा समजा, आजीच्या आजार पण साठी माझ्याकडून औषध घ्या , वाटल्यास मला नातू समजा तेव्हा बाबा म्हणाले नाही.
एक मुलगा मला सोडून गेलेला आहे. उद्या तुम्ही मला जीव लावाल आणि पुन्हा तुम्ही जर सोडून गेलात तर मला पुन्हा थाऱ्यावर येण्यासाठी वेळ लागेल. मी स्वतःला सावरू शकत नाही ,असे म्हणून बाबांनी माझ्या हातामध्ये टाळी दिली बाबांचा तो गरम स्पर्श माझ्या हाताला जाणवत होता मी हात तसाच पकडून ठेवला होता आणि बाबांनी माझा निरोप घेतला.
बाबांनी जरी मला नातू म्हणून नाकारलं असेल तरी माझ्या नात्याला त्यांनी मनोमन माझ्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिलेला होता आणि मनातून हे नाते त्यांनी स्वीकारले होते.आज मला या बाबांचे कौतुक आणि अभिमान सुद्धा वाटत होता की स्वतःवर बिकट परिस्थिती ओढवली असतानासुद्धा दुसऱ्यांसाठी करणारे आणि जगणारे क्वचित आपल्या खूप कमी पाहायला मिळतात त्यांची पाठ माझ्या कडे होती परंतु त्यांना नमस्कार करण्यासाठी मात्र माझे हात मनोमन वळले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.