काश्मीर मध्ये हा सैनिक दररोज ATM मधून ₹१०० काढायचा..कारण पाहून डोळ्यात पाणी येईल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ,मित्रांनो काश्मीर व्हॅलीत सर्वांसाठी मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट लोकांसाठी बंद आहे, एवढंच काय तर भारतीय सैनिकांसाठी सुद्धा आहे. आज आम्ही तुम्हाला एक सत्य घटना तुम्हाला सांगणार आहोत. एका आर्मीतील जवान रात्री ड्युटी संपल्यानंतर काश्मीरमधील ATM मध्ये जाऊन १०० रुपये त्याने काढले. ते पैसे व्यवस्थित त्याने पाकिटात ठेवले व बाहेर पडला. दुसऱ्या दिवशीही हेच घडलं. ATM मधून पैसे काढले व्यवस्थित ते पाकिटात ठेऊन बाहेर पडला.
असं काही दिवस चाललं होत. ATM च्या बाहेरचा सिक्युरिटी गार्ड त्याला रोज पाहायचा. त्या सैनिकाची रोजची कृती पाहून त्याला आधी कीव आली. नंतर त्याच्या मनात शंका यायला लागली, हळूहळू त्याला त्याची भीती देखील वाटू लागली. हा काहीतरी उलटसुलट काम तर करत नाही ना..? माणूस तर आर्मीचा दिसतोय म्हणून तो काही विचारायला बिचकत होता. तशी तिथे रात्रीची वर्दळ खूप कमी असते. पण त्याला काही चैन पडेना.
एक दिवस काही स्थानिक लोकं जवळपास होती म्हणून त्याने धीर केला. काही झालं तर ती माणसं आपल्यासाठी धावून येतील असं विचार करून त्याने त्या आर्मीच्या माणसाला थांबवलं. आणि हलकेच आदराने विचारलं. साहेब तुम्ही रोज येता फक्त १०० रुपये काढता, रोज इतक्या लांबून यायचं, लाईन लावायची आणि फक्त १०० रुपये काढायचं, इतका त्रास करण्यापेक्षा एकदाच पाहिजे तेवढे पैसे का नाही काढत..?
ते ऐकून त्या आर्मीच्या सैनिकाने डोक्यावर हाथ फिरवला आणि आपली वर्दी ठीकठाक केली. त्यावेळेस तो खूप दमलेला दिसत होता पण खंबीर दिसत होता. त्याने शांतपणे उत्तर दिलं, मी जेव्हा पैसे काढतो तेव्हा त्या काढलेल्या पैशाचा मेसेज येतो तो माझ्या पत्नीच्या फोनवर जातो. कारण माझं अकॉउंट तिच्या फोनला लिंक आहे. आणि तिला समजत कि मी अजून जिवंत आहे.
असं हे खडतर आणि बेभरवशी आयुष्य आपल्या वीर जवानांच आहे. आणि त्यांच्या काळजीनं व्याकुळ होणारी त्यांची आई, पत्नी व सर्व कुटुंब आहे. भारतातील प्रत्येक जवानांना DarjaMarathi कडून मनाचा मुजरा..
मित्रांनो तुम्हाला आपल्या जवानांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.