बदाम अशाप्रकारे खाल्लेत तरच पूर्ण फायदा नाहीतर…

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो बदाम खाण्याचे खूप सारे फायदे तुम्हाला माहिती असतीलच. पण बदाम कसे खावेत हा प्रश्न आपल्याला पडला असेल तर याचं अगदी साधं आणि सोप्प उत्तर आहे ते म्हणजे बदाम रात्री भिजायला घालावेत आणि सकाळी त्याची साल आपण काढावी आणि नंतर हे बदाम खावेत.

अनेकजण म्हणतात सालीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. मग साल काढून आपण चूक करतोय. तर मित्रांनो हि जी वरची साल असते ते निसर्गाने बदामाला दिलेलं एक कवच आहे. ज्यावेळी बदामाची वाढ होत असते त्यावेळी बाहेरील जे कीटक आहेत ते या बदामामध्ये शिरू नये आणि बदामातील पौष्टिक घटक त्यांनी खाऊ नयेत यासाठीच निसर्गाने हे कवच बदामाला दिलेलं आहे.

जर आपण सालीसकट बदाम खाल्लेत आपल्या शरीरामध्ये हि साल जाते आणि अँटिनिटरीअंश च काम करते. जे पौष्टिक घटक या बदामातून आपल्या शरीरात जायला हवेत त्या पौष्टिक घटकांना अडवून ठेवण्याचं काम हि साल करते. त्यामुळे त्यांचं पूर्ण पोषण आपल्या शरीराला होत नाही आणि म्हणूनच बदामाचे फायदे शरीराला मिळत नाही.

हि साल जर पोटात गेल्यावर अजून एक दुष्परिणाम असा होतो कि या बदामाचं पूर्ण पचन होत नाही. आणि गॅसेस आणि अपचन यांसारखे त्रास मागे लागतात. म्हणून जर बदामाचं पूर्ण फायदा व्हायचा असेल तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे रात्री भिजत घालावेत आणि सकाळी त्यांची साल काढून हे बदाम आपण खावेत.

herzindagi.com
यापेक्षाही एक चांगली पद्धत आहे बदाम खाण्याची ती म्हणजे बदामांना अंकुरित करणे. काही जणांना आश्चर्य वाटेल कि बदाम अंकुरित केलेलं आम्ही कधी ऐकलेच नाही. मित्रांनो प्रत्येक ड्राय फ्रुटला अंकुर आणता येतात शिवाय काही अपवाद वगळता. बदाम फक्त एक दिवस भिजत घाला दुसऱ्या दिवशी संपूर्ण पाणी काढून टाका आणि २ दिवस हे बदाम तसेच ठेवा. तुम्हाला तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी दिसून येईल कि बदामांना अंकुर आलेलं आहे. 

मित्रांनो कोणत्याही पदार्थाला ज्या वेळी अंकुर येतो त्यावेळी त्यातील पोषक तत्वे असतात ती कितीतरी पटीने वाढतात. तर असे आपण अंकुरित बदाम खाल्ले तर त्यातील पोषक घटक ३० ते ३५ टक्क्यांनी वाढलेले दिसून येतात आणि म्हणून खूप जास्त फायदा आपल्या शरीराला यातून होतो.

आता पुढचा प्रश्न असा आहे कि बदाम किती खावेत..? जगभरामध्ये यावरती संशोधन झालेलं आहे. आणि बदामाचं खूप जास्त सेवन झाल तर त्यामुळे पोटात गॅसेस निर्माण होतात, व्हिटॅमिन E खूप प्रमाणात शरीरात शोषले जाते. आणि या व्हिटॅमिन E चा ओव्हरडोस झाल्यामुळे दुष्परिणाम शरीरावर उदभवतात. तसेच पित्त देखील वाढतं. तर से हे परिणाम होऊ नयेत म्हणून जागतिक संशोधन करण्यात आल आणि त्यातून असे निष्कर्ष आले कि बदाम दिवसाला एखाद्या प्रौढ व्यक्तीने २० पेक्षा जास्त खाऊ नये. तसेच लहान मुलांसाठी ४-५ बदाम खाणे योग्य आहे.

तर मित्रांनो आम्हाला आशा आहे कि तुम्हाला या माहिती मधून तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. जर माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा.

टीप – या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. DarjaMarathi.In याची पुष्टी करत नाही. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांसोबत संपर्क साधावा.

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *