शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक कराल तर आयुष्यभर रडत बसाल? | Share Market Reality

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो पैसे तर सर्वजण कमवतात. कोणी जास्त तर कोणी कमी, पण कमावलेल्या पैशांचं काय करायचं? सोशल मीडियावर या बद्दल अनेक प्रकारचे विडिओ पाहायला मिळतात. त्या मध्ये तुम्हाला सांगितलं जातं कि सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे ठेऊ नका, Fixed Deposit करू नका, घरी पैसे ठेऊ नका,कारण Inflation Rate वाढत असतो ज्यामुळे तुमची पैशांची किंमत कमी होते. सोप्प्या भाषेत सांगायचं झालं तर महागाई वाढत असते त्यामुळे तुमच्या पैशांमध्ये वाढ झाली नाही तर तुम्ही महागाईचा सामना करू शकणार नाही, आणि हा सामना करण्यासाठी सर्वात आधी महत्वाचा मार्ग सांगितला जातो तो म्हणजे Share Market . एका XYZ व्यक्तीने २० वर्षांपूर्वी एक हजार रुपये गुंतवले होते त्याचे आज एक लाख रुपये झाले. एका व्यक्तीने १५ ते २० हजार रुपये गुंतवले होते त्याचे आज करोडो रुपये झाले. यासाठी तुम्ही सुद्धा Share Market मध्ये गुंतवणूक करा.

businesstoday.in

जरी हे सर्वकाही खरं असलं तरी हे अर्ध सत्य आहे. या माध्यमातून करोडो सर्वसामान्य लोकांना फसवण्याचे काम होत आहे. कारण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे सोप्पे आहे परंतु त्यामधून रिटर्न्स मिळवणे खूप कठीण. तुम्हाला चांगल्या पद्धतीने गुंतवणूक करायला हवी. सोशल मीडियावर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडिओंमध्ये विश्वास ठेऊन कोणताही विचार न करता डायरेक्ट Demat Account ओपन करतात, आणि जेवढे सेव्हिंग अकाउंट मध्ये पैसे आहेत त्याची गुंतवणूक करायला सुरवात करतात.

blog.runnymede.com

प्रथम गुंतवणूक १०००, २००० पासून चालू करा नंतर चांगल्या रिटर्न्स नंतर माहिती मिळत जाईल. परंतु बरेच लोक २००० बुडाले असता ४००० गुंतणूक करतात, नंतर त्यांना समजत कि आपण चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली. त्यानंतर पुन्हा १०,००० अशी रक्कम वाढत जाते. परिणामी लाखो रुपयांचे नुकसान होते. मग या लोकांसाठी शेअर मार्केट म्हणजे एक जुगारच बनतो. आज या कंपनीवर पैसे लावले म्हणून थोडा फायदा झाला, उद्या त्या कंपनीवर लावू आणि तिकडे लावल्यानंतर सर्वच बुडतात. फायदा कमीवेळा आणि तोटा जास्त वेळा होतो. आणि नंतर हेच लोक शेअर मार्केट ला जुगारच नाव देतात. जर तुम्हाला माहिती नसेल बिसिनेस कसा चालतो, बॅलन्स शीट काय असते, कोणता बिसिनेस कधी मोठा होणार, कोणता बिसिनेस कधी फेल होणार, कोणती कंपनी फ्रॉड आहे आणि कोणती खरी, त्यांची बिसिनेस स्ट्रॅटजी कशी असायला हवी, त्यांचं फ्युचर काय असेल यांची सर्व माहिती असायला हवी. जेव्हा हि सर्व माहिती मिळते तेव्हा कळतं कि शेअर मार्केट एक जुगार नाही तर एक विचारपूर्वक गुंतवणूक करण्याच साधन आहे.

शेवटी आम्ही एवढंच सांगु कि सुरुवात खूप कमी पैशाने करा. जेवढं नॉलेज आहे त्याच्या १० टक्के फक्त गुंतवणूक करा. जेव्हा तुम्हाला समजेल रिटर्न्स चांगले येत आहेत मगच त्यामध्ये हळूहळू वाढ करायला सुरुवात करा. जर कोणी सांगत असेल करोडो रुपये या मध्ये कमवून देतो, तुला मी टिप्स देतो  तर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या जगात कोणी कोणासाठी फुकट काम करत नाही. त्यामध्ये त्या फंड मॅनेजर चा स्वार्थ असतो, त्याला ते फंड सेल करायचे असतात, त्याचे टार्गेट पूर्ण करायचे असते. म्हणूनच शेअर मार्केटमधील दलालांपासून दूर राहा.

moneycontrol.com

त्यासोबत सध्या एक नवीन ट्रेंड सुरु आहे तो म्हणजे मला जॉब करायचा नाही, मला व्यवसाय करायचा नाही, मला मस्त लाईफ जगायची आहे, त्यामुळे मी घरी बसून स्टॉक मार्केट मध्ये काम करणार, शेअर ची खरेदी विक्री करून करोडो रुपये कमवणार, असं स्वप्न बघून करोडो लोक आपलं करियर बरबाद करत आहेत. कारण त्यांना शेअर मार्केट मधील झिरो नॉलेज असतं. तरी सुद्धा सुरु असलेला कमाईचा मार्ग बंद करून ते घरी बसतात आणि जी रक्कम त्यांनी कमावली होती ती सगळी शेअर मार्केट मध्ये गमवून बसतात. म्हणून शेअर मार्केट मध्ये उतरताना १०० वेळा विचार करून उतरा. जो पर्यन्त तुम्ही कमवू शकता हा विश्वास तयार होत नाही आणि तसे रिजल्ट दिसत नाहीत तो पर्यंत शेअर मार्केट मध्ये मोठी गुंतवणूक करू नका.

तुम्हाला शेअर मार्केट बद्दल दिलेली माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *