तमाशा पुढे बसणारा समाज आज किर्तनाला बसतो..तो फक्त समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराजांनमुळेच..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्राला वारकरी परंपरा लाभलेली आहे. महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आहेत, संतांनी आपल्याला वेगवेगळ्या मार्गांनी जीवनाचा अर्थ समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या संतांनी लोकांना याचं विस्मरण होऊ नये म्हणून ग्रंथ लिहिले आहेत. या ग्रंथाचाच वारकरी संप्रदाय अभ्यास करून आपली परंपरा पुढे चालू ठेवत आहेत. त्यापैकी एक म्हणजेच आपले इंदुरीकर महाराज. इंदुरीकर महाराजांचं पूर्ण नाव निवृत्ती महाराज देशमुख असं आहे. महाराजांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यात अकोला या तालुक्यातील इंदुरी गावात झाला. इंदुरी या गावात जन्म झाल्याने लोक त्यांना इंदुरी या नावाने ओळखू लागले. इंदुरीकर महाराजांचा विवाह साधारण १५ ते २० वर्षांपूर्वी झाला असून त्यांच्या पत्नीचं नाव शालिनीताई देशमुख असं आहे. त्यांना एक मुलगी आणि एक मुलगा अशी दोन मुलं आहेत. त्यांच्या पत्नी म्हणजेच शालिनीताई देशमुख या देखील कीर्तनकार आहेत. इंदुरीकर महाराजांइतकी प्रसिद्धी जरी त्यांना नसली तरी त्या गावोगावी जाऊन वारकरी परंपरेचा वसा चालवतात.
इंदुरीकर महाराज कीर्तन जरी गावरान भाषेत करत असले तरी ते उच्च शिक्षित आहेत. साधारण २२ वा २३ वर्ष्यात महाराजांनी कीर्तन करण्यास सुरवात केली. कीर्तनाची परंपरा अशी होती कि कीर्तनाला फक्त देवांचे दाखले देऊन कीर्तनाला घेतलेले अभंग सोडवले जायचे. पण इंदुरीकर महाराजांनी आपलं कीर्तन हे लोकांसमोर वेगळ्या पद्धतीने मांडलं. संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा महाराज आणि संत तुकडोजी महाराज या संत लोकांचे संदर्भ देत कीर्तन ते सांगायचे. इंदुरीकर महाराजांनीही या संतांचा वारसा चालवलेला आहे असं म्हणणं चुकीचं होणार नाही. कारण इंदुरीकर महाराजही समाजात काही नको असलेल्या रूढी परंपरा यावर भाष्य करत असतात. आपल्या अस्सल गावरान भाषेत आणि विनोदाच्या शैलीने त्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
इंदुरीकर महाराजांचं असं मत आहे कि आजच्या समाजाला देवदेतांचे दाखले देण्यात काहीही अर्थ नाही. समजला त्यांच्या चुका विनोदाच्या शैलीत ते आपल्या कीर्तनातून नेहमी सांगत असतात. देवाची भक्ती आपण नेहमी पूजा अर्चा करून नाही तर आई वडिलांची सेवा करून देवाची भक्ती करू शकतो असे ते नेहमी सांगतात. समाजातील काही मार्मिक दाखले देत जातीपाती न मानता सर्वांनी एकमताने नांदावे असे संदेश इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून देत असतात. तरुणांच्या व्यसन वृत्तीवर देखील महाराज बोचऱ्या विनोदात महाराज त्यांना व्यसनापासून दूर राहण्यात सांगतात.लोकांच्या आजच्या वागण्यामुळे आणि सवयीमुळे समाज कोणत्या दिशेने जातोय याचं अचूक वर्णन महाराज कीर्तनातून करत असतात. ” त्यांच्या याच प्रभोदनामुळे तमाशा पुढे बसणारा समाज आज किर्तनाला बसू लागलाय.आणि हे फक्त आपल्या इंदुरीकर महाराजांमुळेच शक्य झालंय.” आणि म्हणूनच इंदुरीकर महाराजांचं नाव प्रत्येक घरात आज आदराने घेतलं जातं.
महाराज सांगतात कि सगळ्यांना जरी त्यांचं कीर्तन नाही पटलं तरी काही जणांना ती काळाची गरज आहे. त्यांच्या सध्या २ वर्षांपर्यंत कीर्तनाच्या तारखा देखील बुक झालेल्या आहेत. यावरूनच आपल्याला लक्षात येत असेल कि इंदुरीकर महाराज महाराष्ट्रात किती लोकप्रिय आहेत. कीर्तनातून एवढी कमाई असून देखील इंदुरीकर महाराज एकदम साधं आणि सरळ जीवन जगणं पसंत करतात. त्यांनी अनाथ आणि गोरगरीब मुलांसाठी अनेक शाळा सुरु केल्या आहेत. कीर्तनात महाराज नेहमी सांगतात कि दान धर्म केला पाहिजे.
हल्लीच झालेल्या एका कीर्तनामधील वक्तव्याचा आज विपर्यास करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातोय. महाराज खऱ्या अर्थाने प्रबोधन करत आहेत पण समाजातील काही लोकांना त्या गोष्टी चुकीच्या अर्थाने वाटतात आणि त्यामुळेच त्या लोकांना अशी प्रवृत्ती सुचते. महाराजांच्या कार्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलाय आणि पुढेही राहील अशी आम्हाला खात्री आहे.
तर मित्रांनो इंदुरीकर महाराजांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या इंदुरीकर महाराजांबद्दलची हि माहिती सगळीकडे शेअर करायला विसरू नका.