इंदुरीकर महाराजांच्या त्या वक्तव्याचा विपर्यास आज केला जातोय..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर त्याच्या कीर्तनामधील एका वक्तव्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला आहे. आणि लवकरच त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. मंडळी इंदुरीकर महाराजांच्या काहीश्या वेगळ्या पद्धतीने कीर्तन करण्याच्या शैलीने त्यांनी जवळजवळ महाराष्ट्राचे मन जिंकली आहेत. अनेक ज्वलंत विषयावर ते कीर्तन करतात आणि त्यांच्या शैलीत म्हणजे विनोदी पद्धतीने ते मुद्दे जनतेला समजवून सांगतात. त्यामुळेच त्यांच्या कीर्तनांना सुद्धा प्रचंड गर्दी होते. सध्या इंदुरीकर महाराजांची प्रचंड मागणी आहे. एका कीर्तनासाठी लोक त्यांना लाखो रुपये देण्यासाठी तयार असतात. पण तरीसुद्धा २ वर्षांपर्यंत लोकांना तारखा मिळत नाही. कारण २ वर्ष पर्यंतच्या इंदुरीकर महाराजांच्या तारखा बुक असतात.

bolbhidu
मित्रांनो अशाप्रकारे मागणी असणारे इंदुरीकर महाराज हे महिन्याला करोडो रुपये कमवतात. कारण त्यांची एका कीर्तनाची फी पन्नास हजार ते एक लाख याच्या दरम्यान असते. आणि दिवसातून ते असे २ ते ३ कीर्तन घेतात. पण एवढे पैसे कमवून सुद्धा त्यांची राहणी हि खूप साधारण आहे. कारण कमावलेल्या या करोडो रुपयांमधून ते अनाथ मुलांसाठी शाळा चालवतात. म्हणून त्यांना एका कीर्तनकाराबरोबरच अनाथांचा नाथ म्हणूनही ओळखलं जातं.

thodkyat
सध्याचं त्यांच्या एका कीर्तनामधील वक्तव्यामुळे प्रचंड वाद निर्माण झालाय. एका कीर्तनात इंदुरीकर महाराजांनी असं म्हटलं आहे कि,

स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो,विषम तिथीला झाला तर मुलगी होते

अशा प्रकारचं त्यांचं हे वक्तव्य आहे. त्यामुळेच PCPNDT कायद्यानुसार कलम २२ चे उल्लंघन केल्याचा आरोप झाला आहे. याचबरोबरच PCPNDTयाच्या सल्लागार समितीने इंदुरीकर महाराजांना नोटीस पाठविली आहे. त्यांनी या संबंधी इंदुरीकर महाराजांकडून स्पष्टीकरण देखील मागितले. आणि यामध्ये इंदुरीकर महाराजांविरुद्ध पुरावा आढळला तर त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाही करून गुन्हा दाखल करण्यात येईल असं PCPNDT यांच्या सदस्यांनी म्हटलं आहे.

मित्रांनो आम्हाला असं वाटते कि ह्यात त्यांनी कुठेही तुम्ही स्त्री भ्रुण हत्या करा असं सुचवलेलं नाही. शास्त्रीय दृष्ट्या बरोबर का चुक ते वेगळं. ईथे ते फक्त केव्हा काय केलं तर त्याचा काय परिणाम होतो ह्या बद्दल बोलले. लिंग निदान करा, मुलगी असेल तर हत्या करा असं कुठेही सुचीत केलं नाही. जास्तीत जास्त चांगली संतती जन्माला यावी हा उद्धेश आहे त्यांचा , त्या मुळे देशातील बलात्कार व गुंडगिरी कमी होऊन देश प्रगतीकडे जाईल हा उद्धेश आहे महाराजांचा .बऱ्याच लोकांना हे शास्त्र माहिती नाहीए, कारण मुळापासून प्रश्न सोडवणं महत्वाचे आहे “शुद्ध बीजपोटी फळे रसाळ गोमटी ” बलात्कारी नि वाईट मार्गावरील लोकांना कडक शिक्षेप्रमाणे मुळात अशी माणसं निर्माणच होऊ नयेत हा उद्धेश यामध्ये आहे. 
तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते या बद्दल आम्हाला तुमच्या प्रितिक्रिया नक्की कळवा.लवकरचं या वादामधून इंदुरीकर महाराज बाहेर पडतील अशी आम्ही आशा करतो.
हि माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या सर्व मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांना शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *