या पोलिसाने या मुलासोबत जे केले ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज माटुंगा दादर येथे बंदोबस्त करत असताना एक १४ वर्षाचा मुलगा आला आणि विचारलं “साहेब चहा घेणार का..?” कोरोनाच्या महामारीचा विचार करून आधी वाटलं हा कोण, कसा आहे हा चहा, कसा बनवला असेल म्हणून त्याला नको असे सांगितले. पण नंतर मनात काय विचार आला काही कळलेच नाही. त्याला बोलवून घेतले आणि सहज विचारले बाळा नाव काय तुझं..?

तो म्हणाला सागर माने, असं नाव सांगून त्याने अंगावर असलेल्या वर्दीकडे बघितले. त्याने विचारले बाळा चहा का विकतोस..? त्याने सांगितले २९ मार्च ला वडील वारले.  त्यांचं चहाच कँटीन होत, आतापर्यंत जितकं त्यांनी कमावलं होत ते सगळं संपलं. घरात आई आणि मी, आई आजारीच असते त्यामुळे मीच चहा बनवून विकतो. आणि रोज २०० रुपये मिळवतो कारण आता शाळा चालू झाल्या तर वह्या पुस्तके घ्यायला पैसे नाहीत. घरभाडे हि द्यायचे आहे.

असं बोलून तो गप्प बसला. त्याला विचारलं तुला पुढे शिकायचं आहे का..? तर तो पटकन बोलला तुमच्यासारखं पोलीस व्हायचं आहे. त्यावेळेस कोणत्याही प्रकारचा विचार न करता आईवडिलांनी ज्या प्रकारे संस्कार केलेले त्याप्रकारे त्याला दहावीची पुस्तके व वह्या घेऊन दिल्या. आणि त्याला नंबर देऊन सांगितलं अभ्यासासाठी कोणतीही अडचण आल्यास संपर्क कर.

इतके बोलून त्याने बनवलेला कडक चहा घेतला कारण त्याची जिद्द आणि स्वप्न या दोन गोष्टी माझ्यासाठी कोरोनापेक्षाही जास्त महत्वाच्या होत्या. इतके बोलून त्याला धन्यवाद केले व पुढील येणाऱ्या भावी काळासाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला नक्की विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *