LIC मध्ये गुंतवणूक करण्या आधी हे नक्की वाचा..


नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेऊया कि LIC मध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे कि नाही..?


LIC  मध्ये पैशाची गुंतवणूक केल्यावर कोणते फायदे मिळतात ते पाहूया. पोलिसी नुसार त्यांचे मिळणारे रिटर्न्स वेगवेगळे असतात.शक्यतो LIC पोलिसी मुले रिस्क कव्हर होते व गुंतवलेली रक्कम व्याजासह परत मिळते.
काही पोलिसी मध्ये अकाली मृत्यू झाल्यास पोलिसी Mature  झाल्या नंतर जी रक्कम मिळणार असते ती मृत्यूनंतर मिळते.

पोलिसी का करावी ..?

पोलिसी कोणत्याही कंपनीची असो.त्या मध्ये पैसे गुंतवण्याचे कारण रिस्क कव्हर होते. अचानक मृत्यू झाल्यास कुटुंबाची सुरक्षा कोण करणार?,कुटुंबाची आर्थिक मदत कोण करणार ? आपल्या मृत्यूनंतर कुटुंबाची मदत व्हावी म्हणून LIC पोलिसी करणे  खूप गरजेचे  असते.

पोलिसी का करू नये..?

ज्या प्रकारे नाण्याला दोन बाजू असतात त्याच प्रकारे पोलिसी साठी सुद्धा दोन प्रकारे विचार करू शकतो.
पोलिसीमुळे रिस्क तर कव्हर होते पण अकाळी मृत्यू नाही झाला तर काय? अशा नंतर पोलिसी झाल्या नंतरची रक्कम दिसताना  खूप मोठी दिसते पण कॅल्क्युलेशन करून पहिले असता समजते कि मिळालेल्या मुद्दल रकमेवरील व्याज हि खूप कमी आहे. हि झाली दुसरी बाजू.

LIC  मध्ये गुंतवणूक करावी कि नको ?

LIC  इन्व्हेस्टमेंट करिता पाहत असाल तर LIC गुंतवणुकीसाठी नाही. LIC मधून मिळणारे रिटर्न्स खूप कमी आहेत.LIC  मध्ये काही पैसे रिस्क कव्हर साठी भरू शकता जी रक्कम तुमच्या मृत्यूच्या धोक्यापासून तुमच्या कुटुंबाचे रक्षण करेल. पण तुम्ही जेवढे पैसे कमवता ते पैसे LIC  मध्ये गुंतवने चुकीचे ठरू शकते.या सांगितलेल्या माहितीची खात्री करून घेण्यासाठी एका पोलिसीची माहिती घ्या व ती पोलिसी Mature झाल्यानंतर मिळणाऱ्या रकमेचे व्याज पहा. हे व्याज खूप कमी असते. हे पैसे शेअर मार्केट,रिअल इस्टेट , म्युचल फंड , बिसिनेस या मध्ये गुंतवूक केल्यास तुम्हाला जास्त रिटर्न्स मिळू शकतील. LIC  मध्ये व्याजदार ३% ते ६% एवढा असतो.पण तुम्ही वरील ठिकाणी इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला १०% ते २०% पर्यंतचा व्याजदर मिळू शकतो.

पैसे कमवणे खूप सोप्पे आहे  पण ते गुंतवणूक करणे खूप अवघड. जो योग्य प्रकारे त्याची गुंतवणूक करतो तोच यशस्वी व श्रीमंत बनतो. पैशाने पैसे वाढवता येतो म्हणूनच गुंतवणूक करायची असेल तर ती LIC  मध्ये करणे टाळा.

लाईफ सेक्युरिटी साठी काही रक्कम तुम्ही LIC मध्ये गुंतवू शकता पण कमाईचा सर्वात जास्त हिस्सा सेव्ह करण्यासाठी तो LIC मध्ये ठेवत असाल तर ते चुकीचे ठरू शकते 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *