ट्रेननेही प्रवास न केलेल्या विद्यार्थ्यांना चक्क स्वखर्चाने हवाई सफर घडवण्याचं काम या मुख्याद्यापकाने केलं आहे..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बालपणी सर्वच जण कागदाचं विमान उडवतात. आणि ते विमान उडवताना खऱ्या विमानात बसण्याचं स्वप्न पण नक्कीच पाहत असतात. हेच स्वप्न एका मुख्याद्यापकांनी खरं करून दाखवलं आहे. ट्रेननेसुद्धा प्रवास न केलेल्या विद्यार्थींना या मुख्याद्यापकाने चक्क स्वखर्चाने हवाई सफर घडवली आहे. मध्यप्रदेशच्या इंदोरमधील देवास जिल्ह्यात हि सरकारी शाळा आहे. येथीलच एका मुख्याद्यापकाने मुलांचं विमानात बसण्याचं स्वप्न पूर्ण केले आहे. या कामासाठी सर्वांकडून त्यांचं  खूप कौतुक देखील होत आहे.

timesofindia

किशोर कनासे असं त्या मुख्याद्यापकांचं नाव असून १९ विद्यार्थ्यांचं त्यांनी विमानात बसायचं स्वप्न पूर्ण केलं आहे. या मुख्याद्यापकाने आपल्या खर्चाने विध्यार्थ्यांना विमानाने दिल्ली फिरवून आणली आहे. यासाठी त्यांना ६० हजार रुपये एवढा खर्च झाला. स्वतःच्या बचत खात्यातून त्यांनी या विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण केलं आहे. हि मुलं बिजापूर गावातील सरकारी शाळेत शिकत असून त्यांनी इंदोर ते दिल्ली अशी हवाई सफर मुख्याद्यापकांच्या मदतीने केली आहे.

सहावीत शिकणाऱ्या तोहीद शेख याने आम्ही मैदानात खेळताना आम्हाला विमान फारचं छोट वाटायचं पण जेव्हा खरं विमान पाहिलं तेव्हा ते खुपचं मोठं होत असं म्हटलं आहे. यातील अनेक विद्यार्थ्यांनी तर साधं ट्रेनने सुद्धा कधी प्रवास केला नव्हता.  त्यामुळे त्यांनी कधी आपल्याला विमानातून प्रवास करायला भेटेल असं विचार देखील केला नव्हता. म्हणूनच या विद्यार्थ्यांना विमानातून दिल्ली ला नेण्याचा निर्णय घेतला घेतला असं किशोर यांनी सांगितले.

गेल्यावर्षीच मुलांना हवाई सफर करण्याची डोक्यात कल्पना त्यांच्या मनात आली होती.  परंतु त्यावेळी तेवढे पैसे नसल्या कारणाने त्यांनी त्या विद्यार्थ्यांना ट्रेनने आग्रा येथे घेऊन गेले यामुळे मुलांना खूपच आनंद झाला. म्हणून त्यावेळीच त्या मुलांनी आम्हाला पुढच्या वेळी विमानाने प्रवास करण्याची अपेक्षा व्यक्त केलं असल्याचं मुख्याद्यापकांनी सांगितले. पहिल्यांदांच विमानाने प्रवास केल्यामुळे सर्व विद्यार्थी खुपचं आनंदी झाली आहेत.

तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती आवडल्यास शेअर करायला नक्कीच विसरू नका.  

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *