या भारतीय व्यक्तीने लावला ई – मेल चा शोध? | Proud To Be Indian

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. Proud To Be Indian असं म्हणावं लागेल कारण या भारतीयाने लावला होता ई-मेल चा शोध. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा कोण भारतीय होता ज्याने ई-मेल चा शोध लावला.  भारतीय व्यक्तीने

आज संपूर्ण भारतामध्ये इंटरनेट चं मायाजाळ पसरत आहे. नवनवीन शोध लावले जात आहे, रोज ढीगभर अँप्स मार्केट मध्ये दाखल होत आहे. जे काही लोकप्रिय अँप आहेत त्यांचे डेव्हलपर्स विदेशी आहेत. पण खूप कमी लोकांना माहिती असेल कि ई-मेल या जलद गतीने महत्वाचे संदेश पोहोचवण्याच्या प्रणालीचा शोध जो आहे तो एका भारतीयाने लावला आहे. आच्छर्य वाटलं ना? हो तुम्ही बरोबरचं ऐकलंत.

dqindia

शिवा अय्यादुराई असं ई-मेल च्या निर्मात्याचं नाव आहे. २ डिसेंबर १९६३ रोजी त्यांचा जन्म मुंबईमध्ये झाला. आई मीनाक्षी अय्यादुराई वडील व्ही अय्यादुराई आणि बहीण डॉक्टर उमा अय्यादुराई असं शिवाचं छोटंसं कुटुंब आहे. छोटा शिव ७ वर्षाचा असताना आई बाबांसोबत अमेरिकेला गेला. न्यू जोयसीच्या युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसिन अँड डेंटेसिरी मध्ये असताना शिवा अय्यादुराई यांच्या चिकाटी आणि कॉम्पुटर शास्त्र शिकण्याच्या वेडाने प्रभावित होऊन कॉम्पुटर नेटवर्क लेब्रॉटरी चे संचालक डॉक्टर लेसली मिशलसं यांनी तत्कालीन कागदी पत्रव्यवहारात पर्यायी असा कॉम्पुटर प्रोग्रॅम बनवायला सांगितलं. ध्येयं गाठण्याच्या जिद्दीने अंतरकार्यालयीन पात्र व्यवहारात त्यांनी दिवस रात्र एक करून अत्यंत बारकाईने अभ्यास केला. त्यातील एक आवकजावंक यंत्रणेचा व्यवस्तीत अभ्यास केल्यानंतर Inbox, outbox, Drafts Carbon Copy Folder, Address Book आट्याचमेंट साठी वापरायच्या पेपर क्लिप्स याचा इलेकट्रोनिक सिस्टीममध्ये समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी तब्बल ५० हजार फाईल्स चा प्रोग्रॅम कोड तयार केला. आणि तो प्रोग्रॅम कोड म्हणजेच आज आपण वापरत असलेला ई-मेल आहे.

mediaworld

वयाच्या अवघ्या १४व्या वर्षी ई-मेल या प्रोग्रॅमची निर्मिती केली. त्यावेळी त्यांनी आपल्या शोधाचा कॉपीराइटही घेतला होता. १९७८ मध्ये जरी ई-मेल चा प्रोग्रॅम तयार केला असला तरी ई-मेल चा प्रवर्तक किंवा जन्मदाता म्हणून त्याला त्याच श्रेय मिळण्यासाठी आणखी ४ वर्षांचा अवधी लागला. ३० ऑगस्ट १९८२ रोजी अमेरिका प्रशासनाने शिवा अय्यादुराई यानेच ई-मेल चा शोध लावल्याचं जाहीर केलं. आज ई-मेल सर्वात जलद गतीने संवाद साधण्याचे माध्यम बनले आहे.

ई-मेल रेव्होल्यूशन या त्यांच्या पुस्तकात त्यांनी ई-मेल च्या निर्मितीचा रंजक प्रवास वर्णन केलेला आहे. तर बघा मित्रांनो भारतीय असल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे कारण अशाप्रकारचे शास्त्रद्न्य, संशोधक जे आहेत ते भारतमध्ये आहेत परंतु आपल्याला ते माहिती नाहीयत. तर मित्रांनो हि माहिती जर आपल्याला आवडली असेल तर सर्वात जास्त लोकांना शेअर करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *