रस्त्याच्या कडेला असलेल्या दगडांचा रंग वेगवेगळा का असतो? । 99.9% लोकांना याच कारण माहीत नाही

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपले स्वागत आहे. आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा रस्त्याच्या कडेला खूप प्रकारची रंगीबेरंगी दगडं दिसतात. त्यावर गावचे नाव व किती किलोमीटर हे अंतर दर्शविले जाते. त्याला आपण किलोमीटर चा दगडही समजतो. तुम्ही कधी असा विचार केला आहे का कि हे दगड वेगवेगळ्या रंगांनी काय दर्शवतात? या प्रत्येक रंगाचा काय उपयोग आहे? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण घेणार आहोत.

रस्त्यावरील दगडांचा कलर पांढरा,पिवळा,निळा,हिरवा असे का असतात?

tripadvisor.com

जेव्हा आपल्याला पांढरा व पिवळा रंग असलेला दगड दिसतो तेव्हा तुम्ही समजून जा कि तुम्ही नॅशनल हायवे वर आहात. अशा प्रकारचे दगड फक्त नॅशनल हायवे वरतीच पाहायला मिळतात.

hindconcreteworks.com

पांढरा व  हिरवा रंग असलेला दगड जेव्हा रस्त्याकडेला दिसेल तेव्हा समजून जा कि तुम्ही स्टेट हायवेवर आहात. हा रास्ता जेव्हा खराब असेल तेव्हा याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार असेल.

nikhilmachcha.wordpress.com

पांढरा व काळा रंग असलेला दगड हा जेव्हा तुम्ही लांबच्या प्रवासाला निघालेला असाल व वाटेत तुम्हाला कोणत्याची प्रकारचे जास्त दगड दिसत नसतील व फक्त एक काळा व पांढरा रंग असलेला दगड दिसत असेल तर त्याच्यावरून हे समजून जा कि तुम्ही मोठ्या सिटी जवळ आहात. लवकरच तुम्हाला मोठी सिटी वाटेवरती भेटणार आहे.

flickr.com

नारंगी व पांढरा दगड प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत हे दगड लावलेले असतात. अशा प्रकारचे दगड आढळ्यास समजून जा कि तुम्ही ग्रामीण भागाकडे जात आहात. लवकरच एक खेडेगाव तुम्हाला भेटीस येणार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला समजले असेल कि या दगडांचा नक्की काय अर्थ असतो. हि माहिती आवडली असल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला नक्की विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *