2019 मध्ये प्रेक्षकांचा जास्त वेळ न घेता या मालिकांनी घेतला निरोप..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आत्ताच २०१९ वर्ष संपून गेलेलं आहे. आपण आज पाहणार आहोत २०१९ मधील अशा काही मालिका ज्या एका वर्षांमध्ये बंद करण्यात आल्या. यातील काही मालिका मालिकांच्या कथानकांमुळे तर काही कलाकारांच्या कारणांमुळे बंद करण्यात आल्या. आपल्याकडे वर्षानुवर्षे मालिका चालवण्याची जणू काही परंपराच आहे. पण अशा काही मालिका आहेत ज्या प्रेक्षकांना रटाळ होण्याआधीच बंद झाल्या आणि त्यांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. चला तर मग जाणून घेऊया या मालिका आहेत तरी कोणत्या.

१. Jeevlaga (जिवलगा)

loksatta,com

स्टारप्रवाह वरील मल्टीस्टारर मालिका जिवलगा. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर, मधुरा देशपांडे असे दिग्गज कलाकार असणारे हि मालिका अवघ्या ५ महिन्यातचं संपवण्यात आली.

२. Tula Pahte Re (तुला पाहते रे)

timesofindia.indiatimes.com

झी मराठीवरील लोकप्रीतेचा उचांक गाठलेली मालिका तुला पाहते रे. सुबोध भावे, अभिज्ञा भावे, गायत्री दातार यांनी साकारलेल्या उत्तम भूमिकांमुळे हि मालिका एका वेगळ्या स्थानावर पोहोचली. १३ ऑगस्ट २०१८ ला या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला.  १० जुलै २०१९ ला हि मालिका बंद सुद्धा झाली.

३. Sri lakshminarayan (श्री लक्ष्मीनारायण)

voot.com

कलर्स मराठी वरील श्री लक्ष्मीनारायण या मालिकेला लोकांचं भरपूर प्रेम मिळालं. लोकांचं हेच प्रेम टिकवत मालिका अल्पावधीतच बंद करण्यात आली. २७ मे २०१९ ला चालू झालेली हि मालिका नव्हेंबर महिन्यात थांबवण्यात आली.

४. Sath De Tu Mala  (साथ दे तू मला)

marathicinema.com

प्रिया मराठे, पियुष रानडे, वेदांगी कुलकर्णी, सविता प्रभुणे हे कलाकार असणारी Star Pravah वरील साथ दे तू मला हि मालिका देखील २०१९ मध्ये बंद करण्यात आली. ११ मे २०१९ रोजी मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता.

५. lalit २०५ (ललित २०५)


youtube.com

स्टार प्रवाह वरील ललित २०५ हि मालिका अल्पावधीतच बंद करण्यात आली.

तसेच Sony Marathi वरील जुळता जुळता जुळतंय कि, ती फुलराणी, सारे तुझ्याचसाठी, या मालिका देखील अल्पावधीतच बंद करण्यात आल्या. या मालिकांमधील आणखीन काही मालिका ज्या वर्षातच बंद करण्यात आल्या. एक घर मंतरलेलं , वर्तुळ,  तर या होत्या २०१९ मध्ये बंद झालेल्या मालिका. आणि काही मालिका २०१९ पासून २०२० मध्ये सुद्धा चालू ठवण्यात आलेल्या आहेत ज्यांना प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे.

तर या मालिकांमधील तुम्हाला कोणती मालिका आवडत होती हे नक्की कळवा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *