कोरोना व्हायरस मुळे यंदा होळी-रंगपंचमी खेळायची कि नाही..?
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. उत्तर भारतातली होळी किंवा आपला महाराष्ट्रातला धुळवड आणि रंगपंचमीचा सण म्हणजे रंगांचा उत्सव. आणि एरव्ही मोठ्या उत्साहामध्ये हा उत्सव साजरा होत असतो. पण यंदा मात्र अनेकजण पेचात पडलेत होळी खेळायची कि नाही. यामागे एकचं कारण ते म्हणजे कोरोना व्हायरस.
या विषाणूंमुळे होणाऱ्या Covid १९ या आजाराची सुरवात चीनच्या वुहान शहरातून झाली आणि आता जगभरातल्या ७० हुन अधिक देशांमध्ये कोरोना व्हायरस ची लागण झालेले रुग्ण समोर आलेले आहेत. त्या पाश्र्वभूमीवर भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांनीही ट्विट केलंय. आणि कोरोना व्हायरस चा धोका पाहता आपण यंदा होळी खेळणार नसल्याचं जाहीर केलंय.
कोरोना व्हायरस ची भीती असताना खरंच होळी खेळणं धोकादायक ठरू शकतं का.?
डॉक्टर्स च म्हणणं आहे कि कुठल्याही साथीच्या रोगाच्या काळामध्ये होळी न खेळणं किंवा पुरेशी काळजी घेऊनच सण उत्सव साजरे करणं केव्हाही योग्य ठरतं. कोरोना व्हायरस किंवा इतर श्वसनाचा आजारांचा प्रसार रोखायचा असेल तर नका तोंडाला हात न लावणं चांगलं असं डॉक्टर म्हणतात.
त्यांच्या मते साथीच्या रोगांच्या काळामध्ये हात मिळवणं सुद्धा टाळलेलेच बरे. पण धूळवडीचे रंग खेळताना एकमेकांना हातानेच तोंडाला रंग लावला जातो जे टाळता येत नाही. गर्दीच्या जागी गरज नसेल तर जाऊ नका असा सल्लाही जगभरातल्या तज्ज्ञांनी दिलाय.
त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही तीच विनंती सगळ्यांना केलेय. होळीच्या काळात वापरल्या जाणाऱ्या पिचकाऱ्या किंवा अन्य खेळणी हि चीनमधून आपल्या देशात आयात होतात. त्यामुळे भीतीपोटी अनेकांनी ती वापरणं बंद केलेलं आहे. पण या भीतीमध्ये काही अर्थ नसल्याच तज्ञ सांगतात.
तज्ज्ञांचा सल्ला आहे कि तुम्हाला ताप , खोकला किंवा श्वसनाचा त्रास जाणवत असेल तर अजिबात वेळ न घालवता डॉक्टरकडे गेलेलं केव्हाही चांगलंच. तुम्हाला जर का अशी लक्षण जाणवत असतील तर तुमचे डॉक्टर्स तुम्हाला तपासणी करून घ्यायला सांगतील.
सरकारी हॉस्पिटल मध्ये तुम्ही अशा मोफत तपासण्या करून घेऊ शकता. तुमची सुरक्षा आणि सावधानता तुमच्याच हातात आहे. त्यामुळे होळी साजरी करायची कि नाही किंवा कशी साजरी करायची हे तुम्हालाच ठरवायचं आहे.
तर मित्रांनो तुम्ही काय ठरवलंय..? तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि हि माहिती आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर जरूर करा.