अजब सरकार..भारतातील गरिबी दिसू नये म्हणून सरकार बांधतेय झोपड्यांपुढे भिंत.!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २ दिवसांसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. यात ते गुजरातला भेट देणार आहेत आणि या भेटीमध्ये ज्या ज्या भागामध्ये मोदी आणि ट्रम्प जाणार आहेत तो भाग त्यांच्या स्वागतासाठी तयार केला जातोय म्हणजे हा भाग अतिशय चकाचक केला जातोय.

nationalheraldindia

पण मंडळी यामध्ये एक आश्चर्याची आणि वाईट वाटावं अशी गोष्ट म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना गुजरातची गरिबी दिसू नये म्हणून येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या गरिबांच्या झोपड्या या लपवल्या जात आहेत. म्हणजे ट्रम्प यांना या झोपड्या दिसू नये म्हणून रस्त्याच्या कडेला अर्ध्या किलोमीटर लांबीची आणि जवळजवळ ६ ते ७ फूट उंचीची भिंत बांधली जात आहे. मित्रांनो हि अत्यंत वाईट आणि शरमेची गोष्ट आहे कि आपले नेते गरिबी दूर करण्यापेक्षा गरिबांनाच लपवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापेक्षा त्या गरिबांना चांगली घर बांधून दिली असती तर आज त्यांना लपवण्यासाठी भिंत बांधून देण्याची गरज लागली नसती. आणि आम्हाला असं वाटतं कि आपल्या नेत्यांनी सत्य हे स्वीकारायला हवं. देशात गरिबी आहे तर त्याची लाज कशाला वाटली पाहिजे यापेक्षा ती गरिबी दूर करण्याचा प्रयत्न करायला हवा. फक्त भिंती बांधून झोपड्या लपवून गरिबी दूर होणार नाही.

deccanherald

मित्रांनो अशा प्रकारे भिंत बांधण्यावर तेथील जनतेचं असं म्हणणं आहे कि या अगोदर मोठे परदेशी नेते आले तेव्हा येथे रस्त्याच्या कडेला हिरवा पडदा लाऊन या झोपड्या झाकल्या जात होत्या. पण आता मात्र चक्क भिंतच बांधली जात आहे. मंडळी यावर आम्हाला असं वाटतंय कि आपल्या नेत्यांना गरिबीची खुपचं लाज वाटतेय. त्यामुळे ते आता तरी देशातील गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न करतील अशी आपण अपेक्षा करूया. तर मंडळी या सर्व प्रकरणावरती तुमचं मत काय ते आम्हाला नक्की कळवा. आणि हि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर नक्कीच करा. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *