एक ग्लास दुधाच्या बदल्यात या मुलाने मोठेपणी मुलीसोबत जे केले ते पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो हि सत्यघटनेवर आधारित गोष्ट आहे. हो गोष्ट आहे गरीब घरातील एका छोट्या मुलाची. त्यांच्या कुटुंबाकडे जास्त पैसे नव्हते. छोटा मुलगा लहान सहान खेळणी विकून पैसे कमवत होता आणि त्याच पैशांनी आपली शाळेची फी भरत होता.  एक दिवशी असाच तो विक्रीसाठी निघाला होता आणि सकाळपासून त्याने काहीच खाल्ले नव्हते त्यामुळे त्याला जोराची भूक लागली होती.

त्याने मनात विचार केला कि आपण ज्या घरासमोर सामान विक्रीसाठी जाऊ त्यावेळेस सामान विक्री केल्यानंतर पैशाच्या बदल्यात जेवायला मागू. तो एका घरी गेला व बेल वाजवली आणि घरातुन एक मुलगी समोर आली.  तो हैराण झाला आणि गडबडीत त्याने मुलीला पाहून एक ग्लास पाणी मागितले. मुलगी किचन मध्ये गेली आणि विचार करू लागली कि हा मुलगा खूप हैराण झाला आहे. बहुतेक त्याला भूक लागली असणार म्हणून त्या मुलीने पाण्याऐवजी एक ग्लास दूध घेतले आणि ते दूध मुलाला दिले.

मुलगा ते दूध हळूहळू पिऊ लागला आणि मनामध्ये विचार करू लागला कि खरंच या जगात चांगली माणसे अजूनही आहेत, माणुसकी अजून जिवंत आहे. दूध पिऊन झाल्यावर त्याने तो ग्लास मुलीला दिला. व तो मुलगा त्या मुलीला म्हणाला या एका ग्लासच्या दुधाचे  किती पैसे मी तुम्हाला देऊ.? त्यावर ती मुलगी म्हणाली नाही नाही माझ्या आईने मला शिकवले आहे की मदत केली तर त्याच्याकडून पैसे घेऊ नका. मी तुझ्याकडून पैसे नाही देऊ शकत तर तो मुलगा म्हणाला ठीक आहे तुमचे मनापासून आभार मानतो आणि मुलगा तिथुन निघुन गेला ज्यावेळेस तो घरी चालला होता तेव्हा त्याच्या मनात विचार येत होता या दुनियेत माणुसकी अजूनही जिवंत आहे.

thebetterindia.com

त्यानंतर अनेक वर्ष त्याने मेहनत केली सामान विकत राहिला शाळेची फी ते  कॉलेज असे त्याने त्याचे शिक्षण पूर्ण केले. थोड्याच वर्षात तो एक चांगला डॉक्टर बनला,  तो मोठ्या शहरात एक नामांकित डॉक्‍टर बनला होता. त्या मुलाचं म्हणजे त्या डॉक्टरचं नाव होत “हॉर्वर्ड केलिन”,  एक दिवशी ते हॉस्पिटल मध्ये बसले असताना त्यांना कळले कि एक मुलगी त्यांच्या हॉस्पिटल मध्ये ऍडमिट झाली आहे. तिची कंडिशन खूप सिरिअस होती. तिचे नाव व पत्ता पाहिल्यानंतर कळून चुकले कि ती मुलगी त्याच गावाची आहे जिथे मी राहत होतो. त्या गावच्या गल्लीबोळातून सामान विकत होतो. त्याला सगळं एका झटक्यात आठवले.

मग त्याला कळले कि त्या मुलीच्या आयुष्यात चांगले झाले नाही. तिच्या कुटुंबाची परिस्थिती बिघडली होती. तिची तब्येत सुद्धा खराब झाली होती. त्या मुलीला तिथल्या डॉक्टरांनी या मोठ्या हॉस्पिटल मध्ये पाठवण्यास सांगितले होते. या हॉर्वर्ड केलीन डॉक्टरने पूर्ण ताकदीनिशी मोठ्या एक्सपर्ट डॉक्टरांशी चर्चा केली आणि त्या मुलीची ट्रीटमेंट केली, आणि ती मुलगी ठीकही झाली. आता ती एकदम ठणठणीत बरी झाली होती.

त्या मुलीकडे ट्रीटमेंटचे बिल जाणार होते. ज्यावेळेस ते बिल जाणार होते त्यावेळी त्या डॉक्टरने त्या बिलावर एक कागद लावला. आणि तो कागद आणि बिल एका लिफाफ्यात घालून पाठवून दिले. तो लिफाफा नर्सने त्या मुलीच्या हातात दिला व म्हणाली हे ट्रीटमेंट चे बिल आहे. ती मुलगी विचार करत होती कि आता मी पूर्णपणे बरी झाली आहे पण हे ट्रीटमेंट चे बिल कसे भरू असा प्रश्न त्यामुलीसमोर उभा होता. तो लिफाफा ती मुलगी हळूहळू उघडून पाहू लागली त्यातील एकेक कागद पाहू लागली. त्यातील काही रिपोर्ट चे कागद होते आणि त्या रेपोर्टच्या वर एक लहान कागद चिकटवला होता.

healthline.com
त्या कागदावर काहीतरी लिहिले होते ते तिने काळजीपूर्वक वाचले. त्यावर लिहिले होते कि घाबरण्याचे काही कारण नाही. तुमच्या ट्रीटमेंट चे बिल खूप वर्षांपूर्वी एक ग्लास दुधाने भरले आहे. तेव्हा त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले. डॉक्टर हॉर्वर्ड केलीन तिच्यासमोर येऊन उभे राहिले आणि तिला म्हणाले खूप वर्षांपूर्वी तुमच्या गल्लीत सामान विकण्यासाठी आलो होतो. त्यावेळेस मला खरंच खूप भूक लागली होती. त्यावेळी तुम्ही मला एक ग्लास दूध दिले होते आणि माझी भूक भागवली होती. 

मित्रांनो हि छोटीशी घडलेली घटना आपल्याला खूप काही शिकवून जाते. आयुष्यात जर तुम्ही चांगले काम कराल तर तुमच्यासोबत चांगले होईल. जर वाईट केले तर तुमच्यासोबत नक्कीच वाईट होणार. कारण कर्म सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर मित्रांनो हि माहिती आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *