डोनाल्ड ट्रम्प यांची जगातील सर्वात आधुनिक आणि सुरक्षित कार.. सुविधा आणि तंत्रज्ञान पाहून आच्छर्यचित व्हाल..!
नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जगातील सर्वात आधुनिक आणि सुरक्षित डोनाल्ड ट्रम्प च्या गाडीच्या सुविधा आणि तंत्रज्ञान पाहून आच्छर्यचकित व्हाल. जर तुम्हाला विचारलं कि जगात सर्वात जास्त कटिबद्ध व आधुनिक सुरक्षा कोणाची आहे तर तुम्ही निसंकोचपणे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव सांगू शकता. कारण ते जिथेही जातात तिथे त्यांची कार मधूनच जातात.
त्यांच्या गाडीच्या पुढे आणि मागे कायम १४ गाड्या असतात, ज्या सुरक्षा यंत्रणेचा महत्वाचा भाग आहे. जी सुरक्षा यंत्रणा हि डोनाल्ड ट्रम्प च्या कार ला देण्यात आली आहे ती पृथ्वीतलावर कोणाकडेच नाही. याच यंत्रणेचा एक भाग आहे तो म्हणजे न्यूक्लिअर फ़ुटबाँल. जो सतत त्यांच्या सोबत असतो. जगात कुठल्याच प्रेसिडेंट ची सुरक्षा डोनाल्ड ट्रम्प इतकी नाही.
डोनाल्ड ट्रम्प जेव्हा विदेशी दौऱ्यावर जातात तेव्हा त्यांची हि विशेष यंत्रणा कायम सोबत घेऊनच जातात. स्थानिक सुरक्षेसह अमेरिकेची खास सुरक्षाही त्यांच्या सेवेसाठी प्रत्येक शहरात सोबत असते. बाहेर देशातही त्यांना अमेरिकन सुरक्षा कव्हर करते. तसेच स्थानिक सुरक्षा व पोलीस बाहेरच्या बाजूला सुरक्षतेची जबाबदारी सांभाळतात.
यामध्ये त्यांच्या १४ गाड्यांसह आजूबाजूला काही मोटार सायकल्स असतात, ज्या रस्ता तर मोकळा करतातच पण त्यावर बसलेले सक्षम सुरक्षा कर्मचारी कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी सज्ज असतात. ट्रम्प यांच्या सुरक्षा यंत्रणेत सर्वात समोर एक पोलिसांची बीएमडब्ल्यू असते. त्यानंतर अमेरिकन एसयूव्ही, तिच्या मागे २ लिमोसिन कार असतात आणि त्यांच्या मागे एक चेवोर्लेट.
या सर्व व्यवस्थेच्या मधोमध चालणाऱ्या राष्ट्रपतींच्या लिमोसिन ला विशेष सुरक्षा यंत्रणा दिलेली आहे. हि कार बुलेटप्रूफ तर आहेच सोबतच बॉम्ब केमिकल आणि न्यूक्लिअर अटॅक प्रुफही आहे. या गाडीचा प्रत्येक पार्ट खास डिझाईन करून बनवण्यात आलेला आहे. जो योग्य वेळी योग्य भूमिका बजावतो.
राष्ट्रपतींचा ड्राइव्हर एक उत्तम कमांडो असतो. तो कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रपतींच्या सुरक्षततेसह ड्राइविंग करण्यात सक्षम असतो. ड्राइव्हर सीट च्या बाजूला कॉम्युनिकेशन त्याच्या सोबत असतं. मागे राष्ट्रपतींसोबत आणखी ७ लोकं बसू शकतात, आणि दरवाजा उघडन्या व बंद करण्याचे बटन त्यांच्याच हातात असते.
डोनाल्ड ट्रम्प ज्या ठिकाणी बसतात त्या बाजूला एक सेटलाईट फोन आहे. ज्यावर ते सरळ कुठल्याही देशाच्या राष्ट्र्पतींशी बोलू शकतात. त्यांच्याकडे पॅनिक आणि ऑक्सिजन चेही बटन आहे. ज्याचा ते योग्य वेळी वापर करू शकतात. त्यांच्या गाडीचे गेट्स ८ इंच जाड स्टील, अल्युमिनियम, सिरॅमिक व मजबूत धातूंपासून बनवण्यात आले आहे.
या गाडीची केवळ एकाच विंडो उघडते तीही केवळ ३ इंच जी ड्राइव्हर च्या शेजारी असते. याचबरोबर गाडीत जे इंधन भरले जाते त्यासोबत एक स्पेशल स्प्रोम सुद्धा मिक्स केला जातो जेणेकरून एक्सप्लोड होऊ नये. गाडीला खास फायटिंग, टीआरग्यास सिस्टीम, नाईटव्हिसीन कॅमेरा, आणि विशेष टायर्स हि बसवण्यात आले आहेत. जे पंक्चर झाले तरीही काही फरक न पडता गाडी तिच्या गतीत मैलोनमैल चालू शकते.
२०१८ मध्ये डोनाल्ड ट्रम्प जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा त्यांनी स्वतःसाठी खास हि लिमोसिन कार डिसाईन करून घेतली. यापूर्वीचे अमेरिकेचे राष्ट्रपती कॅडलक कार वापरत असत. डोनाल्ड ट्रम्प यांचा विदेशात एक दिवसाचा खर्च २५ मिलियन पाउंड म्हणजे भारतीय चालनानुसार २२ करोड प्रतिदिवस आहे.
यावरून त्यांची सुरक्षा कुठल्या दर्जाची असेल याची कल्पना तुम्हाला आलीच असेल. तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा आणि हि माहिती शेअर करायला देखील नक्कीच विसरू नका.