संयम ठेवणारी लोकं कशी श्रीमंत होतात तुम्हाला हे वाचल्यावर कळेल..!

नमस्कार मित्रांनो DarjaMarathi वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. एका शिक्षकाने आपल्या वर्गातील मुलांना एक एक चॉकलेट दिले आणि नंतर एक विचित्र अट घातली. मुलांनो मी दहा मिनिटात मुख्याद्यापकांना भेटून येतो तो पर्यंत तुम्ही तुम्ही चॉकलेट्स खायची नाहीत. असे सांगून शिक्षक वर्गातून बाहेर गेले.

वर्गात काही क्षण शांतता होती, प्रत्येक मूल त्याच्या हातातील चॉकलेटकडे पाहत होते. आणि प्रत्येक क्षणी स्वतःला चॉकलेट खाण्यापासून रोखत होते. १० मिनिट झाल्यावर शिक्षकांनी वर्गात प्रवेश केला. त्यांनी पाहिल्यावर संपूर्ण वर्गात फक्त ७ मुलांच्या हातात चॉकलेट जशीच्या तशीच होती आणि इतर सर्व मुले चॉकलेट्स खात होती. आणि तिच्या चवीबद्दल भाष्य करत होती.

nytimes.com

शिक्षकाने गुपचूप या ७ मुलांची नावे आपल्या डायरीमध्ये नोंदवून घेतली. नोंद घेतल्यानंतर ती नावं वर्गात त्यांनी वाचून दाखवली. या शिक्षकाचे नाव होते “प्रोफेसर वॉल्टर मिस्चेल”. बऱ्याच वर्षानंतर प्रोफेसर वॉल्टर यांनी स्वतःची डायरी उघडली आणि ७ मुलांची नावे काढून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

addicted2success.com

खूप शोध घेतल्यानंतर त्यांना माहिती मिळाली कि या ७ मुलांनी त्यांच्या जीवनात खूप यश मिळवले आहे. आणि ते त्या त्या क्षेत्रातील लोकांमध्ये खूप यशस्वी आहेत. मग प्रोफेसर वॉल्टर यांनी आपल्या उर्वरित विद्यार्थ्यांचा म्हणजेच ज्यांनी चॉकलेट खाल्ली होती त्यांचाही शोध घेण्याचा प्रयत्न केला.

bmmagazine.co.uk

तेव्हा त्यांना असे आढळले कि त्यातील बरेच लोकं सामान्य ते अतिसामान्य जीवन जगत होते. त्यात असे काही लोकं  होते ज्यांना कठोर आणि आर्थिक आणि सामाजिक संकटांचा सामना करावा लागत होता. तर त्यातील काही व्यसनाधीन देखील झाले होते.

या सर्व प्रयत्नांचा आणि संशोधनाचा परिणाम प्रोफेसर वॉल्टर यांनी एका वाक्यात सांगितला. आणि ते वाक्य असं होत..

जो माणूस १० मिनिटे धेर्य ठेऊ शकत नाही तो आयुष्यात कधीही पुढे जाऊ शकत नाही..!

या संशोधनाला जगभरात प्रसिद्धी देखील मिळाली. आणि त्याला “मार्शमेल्लोव थेअरी” असे नाव देण्यात आले. कारण प्रोफेसर वॉल्टर यांनी मुलांना दिलेल्या चॉकलेट चे नाव मार्शमेल्लोव होते. ते कापसासारखे मऊ आणि उच्च दर्जाच्या चवीचे होते.

या सिद्धांथानुसार जगातील सर्वात यशस्वी लोकांमध्ये धेर्य हा गुण विशेषत्वाने आढळतो. कारण हि गुणवत्ता माणसाची शक्ती वाढवते. ज्यामुळे माणूस कठीण परिस्थितीत निराश होत नाही.  आणि हा गुण विशेष लाभलेला मनुष्य विलक्षण व्यक्तिमत्वाचा धनी असतो. धेर्य हे जीवनाचे सार आहे.

तर मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली..? आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. 

Team DarjaMarathi

One thought on “संयम ठेवणारी लोकं कशी श्रीमंत होतात तुम्हाला हे वाचल्यावर कळेल..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *